नवीन लेखन...

डिजिटल कॅमेरा

डिजिटल कॅमेरा हे साधन आता नवीन राहिलेले नाही. पूर्वीच्या कॅमेऱ्यांच्या जागी २१ व्या शतकात डिजिटल कॅमेरे आले आहेत.

इलेक्ट्रॉनिक इमेज सेन्सरच्या मदतीने प्रतिमेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या या कॅमेऱ्यांना ‘डिजिकॅम’ असे म्हटले जाते. या कॅमेऱ्यांच्या मदतीने दूरचित्रवाणीच्या कॅमेरामन्सच्या खांद्यावरचे ओझेही कमी झाले आहे. कारण हे कॅमेरे अतिशय सुटसुटीत असतात.

पूर्वीच्या कॅमेऱ्यात जशी फिल्म असायची तशी यात नसते. यात प्रतिमा साठवण्यासाठी मेमरी डिव्हाइस असते. या कॅमेऱ्याचा फायदा म्हणजे रोल टाकण्याचा खर्च नसतो व हवी ती छायाचित्रे ठेवून बाकीची काढून टाकता येतात. पर्सनल डिजिटल असिस्टंट, मोबाईल फोन यांच्यात डिजिटल कॅमेरे असतात. अवकाशातील हबल दुर्बीण व इतर खगोलशास्त्रीय यंत्रांमध्येही त्याचा वापर केलेला आहे.

पारंपरिक कॅमेऱ्याप्रमाणे यातही शटर्स, भिंग, फ्लॅश वगैरे बाबी असतातच; पण यात महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे छायाचित्र हे प्रकाश संवेदकावर म्हणजे सेन्सरवर घेतले जाते. हा सेन्सर म्हणजे चार्ड कपल्ड डिव्हाइस (सीसीडी) नावाची एक चिप असते, त्यावर प्रतिमा घेतली जाते. ही चिप बदलण्याची वेळ सहसा येत नाही.

सीसीडी मध्ये सिलिकॉन या सेमीकंडक्टरच्या ठिपक्यांचे जाळेच असते. अतिशय मोठ्या संख्येने हे ठिपके असतात. त्यावर प्रकाश-शलाका पडताच इलेक्ट्रॉन हे ऋणभारित कण निर्माण होतात, त्यापासून डिजिटल संदेश तयार केले जातात, ते मेमरीत साठवून ठेवता येतात. त्यांच्या मदतीने शेवटी छायाचित्र बनते.

डिजिटल कॅमेऱ्यांचे प्रकार

कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा, ब्रिज कॅमेरा, मिररलेस इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा, सिंगल रेंज रिफ्लेक्स, रेंजफाइंडर्स असे अनेक प्रकार आहेत. आता तर डिजिटल कॅमेऱ्याने शुटिंगही करता येते. निकॉन, ऑलिम्पस, सोनी, कोडॅक, कॅनन अशा अनेक कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे सध्या बाजारात आहेत. त्यांच्या किमतीही पाच हजार ते १५ हजारांच्या दरम्यान आहेत.

डिजिटल कॅमेऱ्यात पिक्सेलच्या संख्येवर छायाचित्राचा दर्जा अवलंबून असतो त्यामुळे कॅमेरा किती पिक्सेलचा आहे याला महत्त्व असते, त्याचबरोबर सेन्सरचे रेझोल्यूशन, त्याचा आकार, भिंगाचा दर्जा या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. २.१ मेगापिक्सेल कॅमेऱ्याने काढलेल्या छायाचित्रात रेझोल्यूशन (स्पष्टता) १६०० बाय १२०० म्हणजे १,९२०,००० पिक्सेल (रंगबिंदू) इतके असते. खरे तर ते २,१००,००० पिक्सेल इतके असायला हवे. तीन मूलभूत रंग पकडण्यासाठी या कॅमेऱ्यात फिल्टर्स असतात, नंतर बीम स्प्लिटरच्या मदतीने हा प्रकाश वेगवेगळ्या सेन्सर्सकडे जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..