नवीन लेखन...

डिजिटल घड्याळ

फार पूर्वीच्या काळापासून वेळेच्या मापनाचे ज्ञान माणसाला होते. सावल्यांवरून वेळ सांगितली जात असे.

जलघड्याळानंतर यांत्रिक घड्याळ अस्तित्वात आले, असे पहिले घड्याळ १३६४ मध्ये जेकोपो दोंडी व त्यांच्या मुलाने तयार केले होते. पण मूळ संकल्पना त्याअगोदर विलार्ड हॉनेकोर्ट यांनी मांडली.

मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला.

डिजिटल घड्याळ हे थेट वेळेचा आकडा दाखवते. यात तासकाटा, मिनिटकाटा व सेकंदकाटा असे नसले, तरी तास, मिनिट व सेकंद मात्र दाखवले जातात. डिजिटल क्लॉक  इलेक्ट्रॉनिक ड्राइव्हवर आधारित असते. त्याचा डिजिटल भाग हा डिस्प्लेशी प्रामुख्याने संबंधित असतो. यात ६० हर्ट्झचा सिग्नल पॉवर लाईन किंवा क्रिस्टल ऑसिलेटरने मिळवला जातो. नंतर काऊंटरमध्ये त्याचे दहा भागात विभाजन केले जाते. नंतर पुन्हा सहा भागात विभाजन केले जाते व शेवटी सेकंदाला एक दोलन मिळवले जाते. हा १ हर्ट्झचा सिग्नल सेंकद काट्याचे काम करतो. यात सेव्हन सेगमेंट डिस्प्लेही वापरलेला असतो. आणि १ या बायनरी कोडवर या घड्याळाचे काम चालते.

जगातील मोठे सर्वात डिजिटल घड्याळ जर्मनीतील ऱ्हेनटर्म ड्युसेलडॉर्फ टेलिव्हिजन टॉवरवर बसवलेले आहे. डिजिटल घड्याळात ५० किंवा ६० हर्ट्झ इतकी दोलने असलेली एसी पॉवर वापरतात.

वेळ दाखवण्यासाठी बहुतेक डिजिटल घड्याळांमध्ये एलसीडी, एलइडी किंवा व्हीएफडी यांचा वापर केला जातो. त्यात ए.एम. किंवा पी.एम. असाही उल्लेख असतो. डिजिटल घड्याळ हे मेकॅनिकल घड्याळापेक्षा वेगळे नसते; ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालवले जाते एवढाच फरक असतो.

डिजिटल घड्याळे ही अतिशय सुटसुटीत असतात व फार महागडी नसतात त्यामुळे ती लोकप्रिय ठरली. कार, रेडिओ, टेलिव्हिजन, मायक्रोवेव्ह ओव्हन व सेलफोनमध्ये वेळ दाखवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..