ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला ।
अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।
नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली ।
मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।
प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला ।
आत्मविश्वास जागृत करण्या, ‘भविष्य’ शब्द कामी आला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply