राज सिमरन यांची प्रेम कहाणी असलेला दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे या चित्रपटाचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शन केलं होते. या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल सोबतच अमरीश पुरी, फरीदा जलाल आणि अनुपम खेर हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसून आले होते.
पंजाबमधील सरोसो (मोहरी)च्या शेतांपासून ते स्वित्झर्लंडच्या सुंदर ठिकाणी दिग्दर्शित करण्यात आलेला, आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा चित्रपट शाहरूख खान दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा हा चित्रपट हा त्या चित्रपटांपैकी एक आहे, जो चाहते कधीही, केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकतात. २५ वर्षापूर्वी शाहरूख-काजोलच्या अदाकारीने रंगलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही गाजला होता.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर या थिएटरमध्ये ही जवळपास २४ वर्ष म्हणजेच, १२७४ आठवड्यांपर्यंत चालला. कोरोना व्हायरस महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे मार्च महिन्यापासून थिएटर बंद करण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाची मराठा मंदिरमधील पंचवीशी हुकली, अन्यथा या चित्रपटाने मराठा मंदिर थिएटरच्या मोठ्या पडद्यावरही आपली पंचवीशी पूर्ण केली असती.
शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये मोडणाऱ्या या चित्रपटाची जादू अद्यापही कमी झालेली नाही. चित्रपटातील राज आणि सिमरनची प्रेमकहानी आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply