नवीन लेखन...

शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

शिक्षण, ‘अति-हुशार’ मुले वडिफरंटली एबल्डमुले :

शालेय शिक्षणात सर्वच मुलांवर परफॉर्मन्ससाठी घरून व शाळेतूनही खूपच दबाव येतो. अन्,  नेहमीच्या शालेय विषयांमधे जे कच्चे असतात, ते ‘ढ’ म्हणवतात. अशी मुले साधारण (नॉर्मल) असतील किंवा नसतीलही, पण त्यांच्यात काही इतर क्षमता (abilities) आहेत काय, याचा विचार करायला शिक्षकांनाही वेळ नसतो अन् पालकांनाही.

पारंपारिक शिक्षणपद्धतीत गणित व भाषा यांना अतोनात महत्व आहे. शाळा जोर देतात तो असतो तार्किक-बुद्धिमत्ता व भाषिक-बुद्धिमत्तेवरच (logical-intelligence and linguistic-intelligence). खास करून लेखन-वाचनावर शाळांचा जोर असतो. गार्डनर यांचे म्हणणे असे आहे की, ‘शालेय शिक्षणाचा हेतू ,  विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास करणे, आणि त्याच्या बुद्दिमत्तांना योग्य (suitable) अशा, व्यावसायिक व अव्यावसायिक ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करणे, असा असला पाहिजे.’

शालेय शिक्षणात ,‘ नॉर्मलपेक्षा  वेगळे’ असलेल्या मुलांना तर नक्कीच त्रास होतो. ‘अति-हुशार’ मुलांनाही  इथे ऍडजस्ट व्हायला त्रास होतो. अशी काही अति-हुशार मुले कधीकधी बिघडलेलीही आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.

मला एक उदाहरण आठवते. एक मुलगा शाळेमधे, अभ्यासात अतिहुशार म्हणून गणला जात असे.  सर्वच विषय त्याला चांगले येत असत. ‘सर’ (शिक्षक) जे काही शिकवत होते ते त्याला आधीच येत असल्यामुळे तो वर्गात हळूच कॉमिक्स वाचत असे. ते एकदा सरांनी पाहिले. त्यांना आधीच त्या मुलाच्या परफॉर्मन्सबद्दल माहीत होते. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या मुलाला कारण विचारले. मुलाने शरमून सांगितले की, सर हे तर मला आधीच येत आहे. सरांनी त्याला शिक्षा केली नाही, वर्गाबाहेर पाठवले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परवानगी देत सांगितले, ‘ठीक है, पढ़ो कॉमिक्स. पर किसीको डिस्टर्ब मत करना’. त्यानंतर त्या मुलाने वर्गात कॉमिक्स वाचली नाहीत ! ते सर खरोखरच ‘ग्रेट’ म्हणायला हवे. सरांनी शिक्षा केली असती, तर काय झाले असते ? हा जो अनुकूल परिणाम झाला, तो तर नक्कीच झाला नसता ; कदाचित तो मुलगा तेव्हा, नाहीतर नंतर, बिघडूही शकला असता.

‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वी फारशा शाळाही नव्हत्या. ज्या थोड्याशा होत्या, त्या होत्या अगदी टोकाच्या मुलांसाठी (उदा. डाऊन सिंड्रोम असलेली, ‘मतिमंद’ म्हटली जाणारी मुले). बॉर्डरलाइन मुलांसाठी काहींच वेगळ्या सोयी नव्हत्या. या मुलांच्या शिक्षणाचे काय ? ती मुले नॉर्मल मुलांच्या शाळेतही ‘फिट्’ होत नव्हती, अन् डाऊन सिंड्रोम असलेल्या वा तत्सम मुलांच्या शाळेतही फिट् होत नव्हती.

आपण एका मुलाचे उदाहरण ‘तारे जमीनपर’ या सिनेमात पाहिले आहे. एरवी अभ्यासात लक्ष नसणारा, ‘ढ’ समजला जाणारा हा मुलगा चित्रकलेत निष्णात असतो. जर त्याला समजून घेणारा योग्य शिक्षक मिळाला नसता, तर त्या बिचार्‍याचे आणखी काय हाल झाले असते ?

आज ‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी पहिल्यापेक्षा काहीशा जास्त शाळा आहेत, हे खरे. या शाळांमधे, (शालेय शिक्षणाव्यतिरिक्त), वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे वगैरे व्होकेशनल शिक्षण देतात. अशा शाळांशी संबंधित लोक खरोखरच सेल्फलेस (selfless) सेवाभावी वृत्तीने काम करतात. या शाळांमधील, ‘स्पेशल एज्युकेशन’ या विषयाचे स्वत: शिक्षण घेतलेले शिक्षक-शिक्षिका, अन्य ट्रेनर, संचालक हे सर्व मोठेच सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना माझा सलाम, माझे वंदन ! पुढील श्लोक अशा गुरुजनांसाठीच लिहिलेला असणार.

गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु: गुरुर् देवो महेश्वर:

गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।

गरूच ब्रह्मदेव आहे, गरूच विष्णु आहे, गुरूच महेश्वर शंकर आहे. गुरू साक्षात् परब्रह्म आहे. त्या गुरूला मी नमन करतो.

या संस्थांमधील कार्यावर कसलीही टीका करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवूनही मी असे म्हणू इच्छितो की, या शाळांमधे वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे याव्यतिरिक्तही काही अन्य शिक्षण देता येणार नाही का ? उदाहरणार्थ चित्रकला, गायन, वादन, नृत्य ; तसेच, जिथे शक्य असेल तिथे बागकाम-हॉर्टीकल्चर, वगैरे. मल्टिपल इंटेलिजन्सच्या थिअरीप्रमाणे, जर काही मुलांमधे अशा इतर विषयांमधील गुणवत्ता असली, तर ती मुले त्या त्या शिक्षणाचा नक्कीच फायदा उठवू शकतील.

समारोप :

पहिली गोष्ट म्हणजे, शिक्षणपद्धतीत बदल व्हायला हवा, आणि फक्त ‘तार्किक-बुद्धिमता’ व ‘भाषिक-बुद्धिमत्ता’ यांच्यावर जो अतिरिक्त (excessive) जोर दिला जातो, तो कमी केला गेला पाहिजे ; विद्यार्थ्याचा सर्वांगीण, चौफेर विकास कसा होईल हे पहायला हवे. आज अनेकदा असे दिसते की, अगदी डिग्री घेऊनही तरुणांना जगात कसे वावरायचे ते उमगत नाही. त्यासाठी , आज अनेक ‘व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम’ खाजगी ट्रेनर्सनी सुरू केले आहेत. त्याचे एकमेव कारण आहे, शिक्षणपद्धतीत या आवश्यक गोष्टीचा समावेशच नाही. विद्यार्थ्यांच्या अशा डेव्हलपमेंटसाठीच्या कार्यक्रमांचा रेग्युलर-शिक्षणपद्धतीत समावेश असलाच पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होणे सोपे जाईल.

दुसरी गोष्ट म्हणजे, विद्यार्थी साधारण (नॉर्मल) असो , किंवा ‘नॉर्मलपेक्षा वेगळा’ असो, त्याच्याकडे काही वेगळ्या क्षमता (abilities) असू शकतात, हे शैक्षणिक संस्थांमधील गुरूंनी (शिक्षकांनी) समजून घेतले पाहिजे, व त्या शोधून काढून, त्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे, प्रत्येकाला स्वत:च्या क्षमतांचा (एबिलिटीज् चा) शोध लागेल, व त्याला पुढील जीवनात त्याचा नक्कीच उपयोग होईल.

तिसरी गोष्ट म्हणजे, ‘डिफरंटली एबल्ड’ व्यक्तींसाठी ज्या संस्था असतात तिथे, त्या व्यक्तीची दुसर्‍या एखाद्या, म्हणजे संगीत, चित्रकला, नृत्यकला वगैरे अशा, विषयात अधिक क्षमता आहे काय, याचा शोध घ्यायला हवा ;  तसेच तेथील सर्वांनाच वह्या-मेणबत्त्या याव्यतिरिक्त संगीत-चित्रकला-नृत्य अशा गोष्टींचेही ट्रेनिंग द्यायला हवे. अशा ठिकाणी कंप्यूटर-ट्रेनिंगही (विशेषकरून डेटा-एंट्री व ऍनिमेशन) उपयोगी ठरू शकेल.

थोडक्यात काय, तर, शैक्षणिक पद्धतीत बदल होणे हे, विद्यार्थ्यांची यशस्विता वाढविण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. शुभस्य शीघ्रम् .

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..