नामवंत संकलक, दिग्दर्शक एन एस वैद्य यांचा जन्म १० नोव्हेंबर १९२६ रोजी झाला.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संकलक व दिग्दर्शक एन. एस. वैद्य हे मूळचे पुण्याचे.
वैद्य यांचे नाव नरसिंह शंकर वैद्य, मात्र मराठी चित्रपटसृष्टीत ते एन. एस. वैद्य या नावानेच सुपरिचित होते. त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते. ‘सोंगाडय़ा, एकटा जीव सदाशिव, सामना, सिंहासन, सर्वसाक्षी’ हे त्यांनी संकलित केलेले काही महत्त्वाचे चित्रपट होते.
याशिवाय ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटासह सुमारे ६ ते ७ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. उत्कृष्ट संकलनाबद्दल वैद्य यांना राज्य शासनाचे दहा पुरस्कार मिळाले होते, तर ‘लेक चालली सासरला’ फिल्मफेअर पुरस्काराचा बहुमान मिळाला होता. वैद्य यांचा झी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
एन. एस. वैद्य यांचे निधन २६ एप्रिल २००९ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply