भारतात मालिकांची निर्मिती सुरू झाली ती ‘हमलोग’पासून. पी. कुमार वासुदेव हे १९८४ साली दूरदर्शन वर प्रसारित झालेल्या भारतीय टीव्ही मालिका हम लोग चे दिग्दर्शक होते. ही भारताची पहिली सोप ऑपेरा आणि भारतीय उपखंडातील आणि आशियातील पहिली मालिका होती. ७ जुलै १९८४ साली पहिला भाग प्रदर्शित झाला, १७ महिने ही मालिका चालू होती. या साठी “हम लोग” चा गिनीज बुक मध्ये विक्रम आहे. १९८७ -८८ मध्ये आलेल्या गनदेवता या टी व्ही मालिकेचे दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
‘ऍट फाइव्ह पास्ट फाइव्ह’ हा इंग्रजी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. पी. कुमार वासुदेव यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले, ज्यात त्यांच्या ‘ऍट फाइव्ह पास्ट फाइव्ह ’या इंग्रजी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्काराचा समावेश होता.
पी कुमार वासुदेव यांचे ३१ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply