कलाक्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राजू फुलकर यांच्याकडे पाहिले जात होते. एकांकिकेतून त्यांनी विविधांगी विषय मांडले. राजू फुलकर यांनी चाळीस वर्षे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम केले. ‘लोकधारा’ कार्यक्रमात हृदयस्पर्शी लोकगीते गाणारे गायक, अनेक वाद्ये वाजवणारे वादक ही त्यांची ओळख होती. फुलकर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या एकांकिकांना अनेक पारितोषिके मिळाली होती. वीसहून अधिक संतांच्या जीवनावर त्यांनी साहित्याचा दर्जा आणि माध्यमाचे भान राखून कलात्मक चित्रफिती केल्या. ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटासोबतच ‘संत सावता माळी’ या चित्रपटाचे पटकथालेखन आणि दिग्दर्शन राजू फुलकर यांनी केले होते. ‘आई एकविरा उदो या’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजू फुलकर होते, या चित्रपटाची कथा,पटकथा व संवाद राजू फुलकर यांचेच होते.
राजू फुलकर यांनी गाढवांचं लग्न, आई एकिवरा उधो उधो , कलम ३०२, अभियान, निष्कलंक, आभरान, हसतील त्याचे दात दिसतील अशा विविध चित्रपटांसाठी लेखक, दिग्दर्शन, स्टोरी रायटिंग, आणि कला, संगीत दिग्दर्शन देखील केले. त्यांना चित्रपट उद्योगातील त्याच्या योगदानासाठी झी गौरव, झी टॉकीज, व्ही शांताराम पुरस्कार या सारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले होते.सकाळ, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आणि इतर अनेक स्पर्धांसाठी ज्युरी म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. त्यांनी संत नामदेव, संत जनाबाई सारखे संत महात्म्य अशा अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. ४० हुन अधिक नाटक आणि एकांकिका नाटकांसाठी लेखन देखील केले आहे.
आयुष्यातील सुमारे चार दशके विविध पैलूंद्वारे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला योगदान देणाऱ्या राजू फुलकर यांनी राजू फुलकर फिल्म अकादमी (RPFA) नावाची संस्था देखील सुरु केली होती, चित्रपट उद्योगात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या सर्व स्तरातील गुणवंत कलाकारांना घडविण्याचे मोलाचे योगदान त्यांनी दिले. पुणे, मुंबई, तुळजापूर, नागपूर, गडचिरोली अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर मराठी आणि हिंदी भाषेतील अनेक विद्यार्थ्यांना घडवले.
सूत्रसंचालक, मुलाखतकार आणि निरूपणकार अशा विविध भूमिका बजावणार्या ऋतुजा फुलकर या त्यांच्या कन्या होत.
’मुंगी उडाली आकाशी’, ’कथा सप्तशृंगीची’, ’संत बाळूमामा’ या व्हीसीडी फिल्मसमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नाटक, एकांकिका यांच्यात कायमच सहभाग राहिला आहे. त्यांनी ’सिग्नेचर’ या लघुपटात प्रमुख भूमिका केली. त्यानंतर एका चित्रपटासाठी ‘क्रिएटिव्ह हेड’ पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
राजू फुलकर यांचे १ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply