पाहिजेत पाहिजेत मॉम डॅड,
जे आमचे करतील लाड,
आणि संपली एकदा गरज
की आम्ही करू त्यांना डिस्पोज ।
डॅड, जे केजी टू कॉलेज
देतील डोनेशन बिन बोभाट ।
व्यवसाय, नोकरी, जाणतात राज,
अशा डॅडची आहे गरज आज ।
एक मॉम स्कूटरवरून
शाळेत येइल पोहचवून ।
नूडल्स पिझ्झा चाऊ चाऊ,
लंच घालेल खाऊ ।
कॉलेज दोस्तांना
करुन देईल डिशेस नाना ।
मी सिलेक्ट केलेली मैत्रीण
निमूट स्वीकारील सून म्हणून ।
नंतर तिचं काय काम ?
हवी अशी एक मॉम ।
आव्हान आमचे शास्त्रज्ञांना
एक असं कपल बनवताना
तरुण पिढी देईल दुवा
हवा हवा डिसपोजेबल
मॉम डॅडचा एक सेट हवा.
— सुधा मोकाशी
Leave a Reply