दिव्याची ही ज्योत ,
सांजवेळी साथ
स्वतःला जाळूनही
उजळते ती वात,
दिव्याची दिवे लागणी
अन दिव्याची ही रात
सारीकडे सारा उजेड,
तिमिरास जागा नाही आत
लक्ष दिवे उजळलेत,
लक्ष अजूनही प्रतीक्षेत
उद्या उगवेल म्हणून कुणी अजूनही बसलेय आशेत
तेल जाते जळून नि
दिवा होतो शांत,
उद्या पुन्हा जळण्यासाठी वाट पाहते ती वात ..
— वर्षा कदम.
Leave a Reply