रे चंद्रा तू कसा दिसतो,
अवचित ह्या वेळीं,
भास्कराच्या ह्या साम्राज्यीं,
दूर अशा त्या स्थळीं ।।१।।
कोठे आहेत असंख्य सैनिक,
जे तुला साथ देती,
कां असा तूं एकटाच आहे,
दिवसा आकाशांती ।।२।।
शांत असूनी तुझा स्वभाव,
फिरे त्याच्या राज्यांत,
एकटाच बघूनी तुजला,
लक्ष्य न जाई त्यात ।।३।।
कडक स्वभाव तो भास्कराचा,
नियमानें चालतो,
चुकून देखील तुझ्या राज्यीं,
कधी येत नसतो ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply