असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।
तेल नाही म्हणून पाण्याऐवजी मेणबत्ती लावू नये ।
पारिजातकाच्या सड्यासारखे रक्ताचे थेंब पडताना ।
बाँबस्फोटचे आवाज, तलवारी नाचताना ।
भ्यायलेल्या हरिणीसारखे घरात लपताना ।
रोषणाईच्या माळा मला भावतच नाही ।
असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।।१।।
पु़ढार्यांच्या भूलथापांना भाळून जाण्यासाठी ।
करंट्याचा जन्म आमुचा असतो मरण्यासाठी ।
त्यांच्या खुर्चीखाली असते जीवन सरण्यासाठी ।
ते मात्र निर्लज्जपणे दारोदारी फिरतात मतांसाठी ।
असे वाटते की… ।।२।।
एन्रॉनचे फुगे उडताना आमच्या घरी रॉकेल नाही ।
भ्रष्टाचार करताना यांची पोटे फुटत नाही ।
करंज्या कडबोळी खायला आमच्या घशात दात नाही ।
गरीबांना घरे देताना घरांवर नांगर फिरल्याशिवाय रहात नाही ।
असे वाटते की… ।।३।।
— चंदाराणी कोंडाळकर
वरसगांव, कोलाड
Leave a Reply