या दिवाळी अंकात माझा ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यातील राजकीय नेतृत्व’ या विषयवार लेख प्रसिद्ध झाला आहे. हा विषय मला देण्यात आला होता.
सदर दिवाळी अंकात महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय नेतृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या अंकाचे संपादक श्री. राम शेवडीकर असून, प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि साक्षेपी लेखक श्री. प्रवीण बर्दापूरकर या अंकाचे अतिथी संपादक आहेत.
या अंकाचं वाचन महाराष्ट्रातील सर्व विचारवंत, राजकीय क्षेत्रातील लोक आवर्जून करतात आणि म्हणून या अंकात मला स्थान मिळणं, हे मला भाग्याचं वाटतं..!!
परवाच, दिनांक २० ऑक्टोबरला या अंकाच प्रकाशन झालं..!
प्रतीसाठी संपर्क- ९४२२१७१८८५ /९८२३६७४९२०
या अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाचा हा अंश..-
सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यातील राजकीय नेतृत्व..
…पुढे जाण्यापूर्वी मी एक विनंती करू इच्छितो, की मी या लेखात पुढे कधी जेंव्हा कोकण बोलतो, तेंव्हा मला सिंधुदुर्ग जिल्हा असं अपेक्षित आहे, हे कृपया लक्षात घ्यावं. राजकारणतलं सर्व कळतं असा आम्हा कोकण्यांचा समज असतो आणि बऱ्याच अंशी तो खराही असतो. मी तसा राजकारणातला किंवा राजकारणाची आवड असलेला मुळीच नाही. त्यातही मी तिथे कायांचा राहण्यास नसल्याने. माझा तेथील डे टू डे घटनांशी संबंध येत नाही परंतु गांवातील घडामोडींकडे लक्ष असताना, राजकारणाला टाळता येत नाही आणि ज्या बातम्या हाती किंवा कानी येतील त्य्वरून माझा असा एक अंदाज लावण्याचा मी प्रयत्न करत असतो. माझ्या नजरेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याचे राजकीय वारे आणि त्यातून उदयाला येत असलेलं बरं-वाईट नेतृत्व, याचा एका त्रयस्थ, अ-राजकीय परंतु कोकणच्या भल्या बुऱ्यावर आस्थेने लक्ष असलेली एक व्यक्ती, या नात्याने मी या लेखात आढावा घेणार आहे. अर्थात असा आढावा घेताना मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरुवातीपासूनच्या राजकारणाचा अगदी थोडक्यात आणि धावता आढावा घेणार आहे;नाहीतर साध्याच राजकारण कसं आणि कोणत्या दिशेने चाललं आहे याचा नीटसा अंदाज आपल्याला येणार नाही. आणखी एक, मी राजकारणातला जाणकार किंवा राजकारणावरचा अधिकारी भाष्यकार नाही, त्यामुळे गत काळातील काही व्यक्ती, घटना आणि त्यांचा कालावधी यांचा उल्लेख सुटला असण शक्य आहे. माझा प्रयत्न आजच सिंधुदुर्गातील राजकारण कसं आहे आणि पुढे ते कोणत्या दिशेने जाईल, याचा अंदाज दाखवण्याचा आहे…
-नितीन साळुंखे
9321811091
प्रतीसाठी संपर्क- 9422171885 /9823674920
Leave a Reply