नवीन लेखन...

दिवाळीचा फराळ आणि वाढते वजन!

Diwali, Snacks and Increasing Weight

लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे  याकरता पाच सोप्या टिप्स.

१. येता जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट.

२. दिवाळीचा फराळ करताना अधून मधून कोमट पाणी प्या; जेणेकरून हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही.

३. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतके नुकसान या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्या.)

४. चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतानादेखील बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळीचे पीठ असे तयार करा.

५. नियमितपणे व्यायाम आणि भूक नसताना काही न खाता भूक लागेपर्यंत अधून-मधून गरम पाणी पिणे या दोन मार्गांचा अवलंब या काळात केलात तर वजन वाढण्याची भीती राहणार नाही.

दीपावलीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..