नवीन लेखन...

डीएनएमधील नत्रयुक्त घटक

डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि, पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील ॲडेनीन, रायबोज साखरेबरोबर अँडिनोसिनचा रेणू बनवितो. अँडिनोसिन फॉस्फेटशी बंध तयार करून असे काही रेणू बनवितो ज्यात विविध प्रक्रियांसाठी लागणारी उष्मांक शक्ती सामावलेली असते. जेव्हा ॲडिनोसिनला फॉस्फेटचे ३ रेणू एकापुढे एक जोडले जातात तेव्हा अॅडिनोसिन ट्राय फॉस्फेट (एटीपी) बनतो व हा पेशीतील सर्वात जास्त उष्मांक असलेला रेणू असतो. जशी पेशीला गरज लागेल तशी ऊर्जा या ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेटपासून मिळू शकते.

असेच इतर नत्रयुक्त घटकसुद्धा फॉस्फेटधारक रेणू बनवतात. आपण श्वासोच्छ्वासातून मिळविलेली ऊर्जादेखील या फॉस्फेटधारी रेणूत साठविली जाते. शरीरात जेव्हा ग्लुकोजचे पचन होते तेव्हा मिळणारी ऊर्जा अशीच एटीपीच्या रूपात उपलब्ध होते. त्यामुळे आपल्याला थकवा आला असेल तर ग्लुकोज घेतल्यावर तरतरी येते. या एटीपीसारखेच जीटीपीसुद्धा ग्लुकोजपासून मिळू शकते. तसेच हे फॉस्फेटधारी रेणू अनेक विकर प्रक्रियांमध्ये सुद्धा मदतनीसाची भूमिका बजावतात.

थायमिन आणि सायटोसिन या पिरिमिडीन घटकांशी साम्य असणारे इतर उपयुक्त संयुगे म्हणजे थायामिन, रायबोफ्लेविन आणि फोलिक अॅसिड ही बी वर्गातील जीवनसत्त्वे.
हे घटक आपल्याला आपल्या आहारातून मिळू शकतात. तसेच या वर्गातील काही घटक कर्करोग, एड्स, थायरॉइडची व्याधी यांवर उपाय करण्यासाठी मदत करतात. या दोन्ही वर्गांच्या रेणूंच्या तोडमोडीमुळे (चयापचयामुळे) अमोनिया बनतो. त्याचे रूपांतर युरियामध्ये होऊन तो शरीराबाहेर

टाकला जातो. काही वेळा प्युरिनचे रूपांतर शेवटी युरिक अॅसिडमध्ये केले जाते. जर रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर युरिक अॅसिडचे स्फटिक सांध्यांमध्ये साठले जातात आणि त्यामुळे गाऊटसारख्या व्याधीचा प्रादुर्भाव होऊं शकतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या प्रथिनाच्या सेवनावर निर्बंध घालावे लागतात. मांसजन्य प्रथिनात प्युरिनचे प्रमाण जास्त असते. पण जर दुग्धजन्य पदार्थांचा विचार केला तर त्यापासून मिळणाऱ्या
प्रथिनांपासून प्युरिन मिळण्याची शक्यता कमी असते.

-डॉ. मृणाल पेडणेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..