नवीन लेखन...

ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : भाग – १

ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : कांहीं दिशादर्शक प्रश्न : भाग – १

प्रास्ताविक : गीता, ज्ञानेश्वरी आणि मी :  कांहीं आठवणी :

शके १२१२ मध्ये ( इ.स. १२९०) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ‘लिहिली’. गेली ७२५ वर्षें ज्ञानेश्वरीनें विचावंतांच्या तसेंच जनसाधारणांच्या मनांवर गारुड केलें आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्.गीतेवरील ‘टीका’ आहे, भाष्य आहे.

माझा गीतेशी संबंध लहानपणींच आला. मी ६-७ वर्षांचा असतांना माझ्या आजोबांनी ( नानाजी, आईचे  वडील) गीतेचे कांहीं अध्याय मला शिकवले व मुखोद्गतही करविले. त्यानंतर  कांहीं काळानें  ते मला जिल्ह्याच्या ठिकाणीं घेऊन गेले, जिथें लहान-मुलांच्या  गीतापठणाच्या कार्यक्रमात  मी भाग घेतला. ही साधारणपणें १९५२ ची घटना असावी. त्यावेळी मला मिळालेली,  गीता प्रेसनें प्रकाशित केलेली, भगवद्.गीतेची प्रत आजही, ६५एक वर्षांनंतर माझ्या संग्रहीं आहे.  माझ्या लेखीं तिचें एक भावनिक महत्व आहे.

नंतर कांहीं वर्षांनी मी शिक्षणासाठी परगांवीं रहात असे.  त्या काळात, मी सुट्टीत घरीं आल्यावर,  याच आजोबांनी माझ्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घेतली. मला वाटतें की ‘दृष्टिदौर्बल्य’ ही त्यांनी मला पटणारी सबब म्हणून सांगितली असावी, कारण ते जरी त्यावेळीं ८०-८२ वर्षांचे होते, तरी ‘केसरी’मधील मोठ्या टाइपाच्या बातम्या ते विनाकष्ट वाचत असत. साखरे महाराजांनीं संपादित केलेली ज्ञानेश्वरी माझ्या आईकडे  होती. ती मी वाचूं लागलो. श्लोक, ओव्या , अर्थ , असें मी वाचायचें, आणि त्यावर मधून मधून आजोबा भाष्य करत. आजोबांनी पूर्वी व्यवसाय म्हणून शिक्षकाची नोकरी केलेली होती. पण त्यांचा अध्यात्मिक अधिकार बर्‍यापैकी मोठा होता. अक्ककोटच्या स्वामींचें ( स्वामी समर्थ) एक शिष्य हे आजोबांचे गुरु होते. माझ्या या ज्ञानेश्वरीवाचनाच्या वेळी, माझ्या आजीही  ( दादी,वडिलांची आई) नेमानें ऐकायला बसत. त्या फारशा साक्षर नव्हत्या, पण त्या मोठ्या भक्तिभावानें तें सर्व ऐकत असत. खरें सांगायचें तरयाआजोब व आजी (नानाजी आणि दादीजी) यांच्यासाठीच मी त्याकाळीं ज्ञानेश्वरी वाचली. स्वत: होऊन असें वाचन त्याकाळीं माझ्याकडून झाले असतें की नाहीं, याबद्दल मी साशंक आहे. पुढे १९६४ला आजोबांचें (नानाजींचें) निधन झाल्यावर हें वाचन थांबलें ( तें थांबलेंच). ज्ञानदेवांच्या लेखनाचा अर्थ मला त्यावेळी फारसा कळला नव्हता ( आणि, आज वयाच्या ७३ व्या वर्षींही समजलेला आहे, असें मला  अजिबात वाटत नाहीं).

त्यानंतर, १९७० च्या आगेमागे, मुंबईतील मालाड येथें दर रविवारी प्रो. केशवराव बेलसरे (बाबा) यांचें ज्ञानेश्वरीवरील निरूपण ऐकण्यांचें भाग्य मला लाभलें. त्यांचा अध्यात्म क्षेत्रातील अधिकार फारच मोठा होता. त्यांचें निरुपण ऐकणें ही एक मोठी पर्वणीच होती.

कट् टु दि प्रेझेंट्  . २०१७ मध्ये एकदा  माझे ज्येष्ठ बंधू (कझिन्) अशोक पाटणकर यांच्याबरोबर कांहीं चर्चेचा योग आला. ते माझ्यासारखेच इलेक्ट्रॉनिक इंजीनियरआहेत. त्यांचा स्वत:चा व्यवसायही आहे.   पण आपल्या विषयाच्या अनुषंगानें सांगायचें म्हणजे, ते एक ‘डेडिकेटेड्  साधक’ आहेत. त्यांच्याशी झालेली चर्चा  ज्ञानेश्वरांच्या भाषेबद्दल होती.

 

ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते.  ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें  येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य  के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान  वगैरे  विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे .  तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार  घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच.

(पुढे चालू) …….

सुभाष स. नाईक
M- 9869002126
Email : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com   ,  www.snehalatanaik.com.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..