नवीन लेखन...

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

Dnyaneshwari Adhyay 2 Ovi 58

जरी सरिताओघ समस्त।
परिपूर्ण होऊनि मिळत।
तरी अधिक नोहे ईषत।
मर्यादा संडी।।

(ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे

उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणत असत- “राजकारण करायचे ते सत्ता मिळवण्यासाठी, पण मिळालेल्या सत्तेचा मोक्ष असतो ती सत्ता गोरगरिबांसाठी राबवण्यामध्ये! ही राजकारणाची मर्यादा!”

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स किंवा इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर अफाट संपत्ती मिळवली. पण नंतर ते त्या संपत्तीचे-सत्तेचे विश्वस्त बनले. त्यांनी विविध ट्रस्टच्या माध्यमातून करोडो लोकांना, विविध देशांना मदत केली. याचे कारण, त्यांनी मिळवलेल्या सत्तेचा, पैशाचा माज केला नाही. त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत.

ज्ञानदेव हेच सांगतात, “सागरामध्ये जरी सर्व नद्या येऊन विलीन होतात, तरी त्यामुळे तो जरूरीपेक्षा जास्त फुगत नाही वा स्वत:ची मर्यादाही ओलांडत नाही.”

आपल्या तरुण मनांमध्ये गगनाला गवसणी घालण्याची इच्छा असते. पण गगन कवेत आल्यावर त्या गगनावर अधिराज्य गाजविण्यापेक्षा आपण त्या गगनाचे विश्वस्त आहोत ही भावना बाळगणे महत्वाचे आहे. हीच मर्यादा. ह्या मर्यादेचे अत्यंत संयमाने पालन केले ते छत्रपती शिवरायांनी. त्यांनी अपरिमित यश मिळवले, पण अंतिमत: “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे,” ही त्यांची भावना कायम ठरली. हीच मर्यादा हाच संयम!!

— नितीन आरेकर

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..