नवीन लेखन...

तुम्ही वैद्य लोक स्वतः पथ्य पाळता का हो?

प. पू.वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे वैद्य अ. दा. आठवले) म्हणत की “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” वरवर पाहता वैद्यांनी स्वतः पथ्य न पाळता राहीले तरी चालते अशा अर्थाचे हे वाक्य भासत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यात खूप गहन अर्थ दडलेला आहे.

बहुतांशी आयुर्वेदीय वैद्यगण स्वतः पथ्ये पाळूनच राहत असतात. कित्येक वैद्य तर संध्याकाळच्या दवाखान्यापूर्वीच जेवूनदेखील घेतात! क्वचित अपथ्य झालेच तर त्यांवरचे उपायदेखील ते लगेच करत असतात. उदाहरणार्थ घरी कितीही पथ्ये पाळत असलो (माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना हे पुरेपूर माहिती आहे. ‘तो नाही खाणार हे; आयुर्वेदवाला आहे तो’ असे संवाद आमच्याकडे नित्यनेमाचे असतात ) तरी व्याख्यानाच्या निमित्ताने भटकंतीवर असल्याने खाण्याची वा दिनचर्येची पथ्ये सतत पाळणे दुर्दैवाने अशक्य असते. कधीतरी चीझसारखे पचायला जड पदार्थदेखील आहारात येतात; अर्थात क्वचितच. अशा वेळी मी ‘उद्गारशुद्धी’ हे आयुर्वेदाने सांगितलेले पचनाचे लक्षण दिसेपर्यंत चक्क लंघन करतो. फक्त गरम पाणी पीत राहणे हा माझा आहार असतो. आधीचा आहार पचून भूक लागल्यावरच पुढचा आहार घेतो; न लागल्यास संपूर्ण लंघन करतो. नियमितपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना आहाराचे सरसकट नियम लागू होत नाहीत हा देखील आयुर्वेदाचा सिद्धांत आहे बरं!! अर्थात मी इथे केवळ विषय समजावून देण्यासाठी माझे उदाहरण दिले. बहुतांश वैद्य अपथ्यसेवन झाल्यास हेच करत असतात.

मात्र असे असले तरी लोकांना आरोग्याबद्दल सांगत असताना ‘पथ्य पाळा’ असे सांगणे हे त्यांच्याच हिताचे असते. ती न पाळल्यानेच बहुतांशी लोक आजारी पडत असतात. तसे करताना अतिशय स्पष्ट शब्दांत ‘काय घ्यावे आणि काय टाळावे’ हे लिहावे लागते. उगाच घाऊक दराने ‘common sense’ वर गोष्टी सोडून देऊन चालत नसते. दात न आलेल्या बाळाला ‘तू लाडू कसा खाल्लास? कॉमन सेन्स नाही का तुला?’ असं आपण विचारत नाही. त्याला लाडू न देण्याचा कॉमन सेन्स आपण पाळायचा असतो. इथेही तसेच आहे. त्यामुळे ‘तुम्ही वैद्य लोक स्वतः सगळी पथ्य पाळता का हो?’ असा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांनी “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” हे भरतवाक्य कायम ध्यानी ठेवावे.

 

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Aug 20, 2016

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..