नवीन लेखन...

खरंच याला महत्त्व द्यायचं का?

ज्या गोष्टीचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टीना भारतात डोक्यावर घेतले जाते.

इंग्रजी : जगात कुठेही नसेल इतके महत्त्वच भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जाती… अरेरे!!!

गोरेपणा : गोरेपणाला भारतीय मूर्ख मंडळी एवढी भूललेली आहेत की या गोष्टीचा फायदा घेऊन काही नामवंत कंपन्या गोरे बनवण्याच्या क्रिम तयार करून दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात!

रियालिटी शो : यात तर सगळं ठरवून केलं जातं आणि भारतीय मूर्खासारखे खरं समजून बघत वसतात. त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात. हेच खुप मोठं दुर्दैव आहे.

लग्नसमारंभ : बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग… काही बापांना तर २५ वर्षे जीव लावलेल्या मुलीच्या विरहापेक्षा दिखावा महत्त्वाचा वाटतो.

इंजिनियरींगची पदवी : ७० टक्के मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडू, देशभक्त बनण्यापेक्षा इंजिनियरिंग पदवी मिळवून श्रीमंत बनावं असेच वाटते. बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का?

सोने : जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवून अंगावर घालण्यासाठी आणि लॉकरमध्ये पूजून ठेवायसाठी भारतीय महिला जणू काय शपथ घेऊन बसल्यात. या सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते.

क्रिकेट : भारतात क्रिकेट हा खेळ नसून धर्मच मानून त्याची पूजा केली जाते. लाखो-करोडोंची सट्टेबाजी चालते. भारतातल्या इतर खेळाना जगात स्थान आहे पण भारतात फक्त क्रिकेटच आपल्या मानगूटीवर बसलंय. त्यात परत भारत-पाकिस्तान सामना असेल तर मग ते एक धर्मयुद्धच असते.

बोर्डाची परीक्षा : जगात कुठे दिले जात नाही एवढे भारतात बोर्डाच्या परीक्षेला महत्व दिले जाते! किती तरी मुलं तर बोर्डाची परीक्षा ऐकूनच एवढे धाबरतात की ते परीक्षेला सुद्धा जात नाहीत. या परिक्षेच्या निकालावरुन आत्महत्याही होतात.

परदेशी जंक फूड : जे खाद्यपदार्थ आता परदेशातही जंकफूड मानले जातात ते आपल्याकडे हौसेने खाल्ले जातात. लहान मुलांना तर ते कौतुकाने खायला घातले जातात. कधीकधी तर हे पदार्थ जनावरांनी खाण्याच्याही लायकीचे नसतात.

हेच भारताचे दुर्दैव आहे. ते बदलणार कोण?

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..