नवीन लेखन...

कोलेस्टेरॉलसंबंधी आपल्याला ह्या गोष्टी माहित आहेत का

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अतिरिक्त वजनवाढ, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आपल्याला हल्ली कोलेस्टेरॉलची भीतीही वाढू लागली आहे. पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असणारा कोलेस्टेरॉल आता सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे. सध्या गोडेतेलाच्या जाहिरातीमध्ये कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवून आपल्याला घाबरवले जाते. कोलेस्टेरॉलसंबंधी भरपूर गैरसमज, काळजी, भीती आहे कारण त्याचा थेट संबंध हा हृद्यविकाराशी येतो.

जर आपण कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थाचा समावेश आपल्या जेवणात केला तर खरंच आपल्याला हृदयविकार होऊ शकतो का? तसेच कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल प्रमाण वाढते का? अशा अनेक शंका सर्वांच्या मनात सतत येत राहतात.

इ.स.१९६० सालमध्ये  “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकारासंदर्भात संशोधकांनी अभ्यास केला. यामध्ये शरीरातील कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर खोलवर अभ्यास केला गेला. जवळजवळ दहा-बारा वर्षे हा अभ्यास चालू होता. ह्या अभ्यासाअंतर्गत असा निष्कर्ष निघाला की, ज्या लोकांच्या शरीरात रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढलेले आढळून आलेले आहे. ह्याचाच अर्थ शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉल मध्ये झालेली वाढ ही हृदयविकाराला आमंत्रण देण्यासारखी आहे. आपल्याकडे आहारासंबंधी असलेल्या अज्ञनामुळे  लोकांमध्ये  विविध  गैरसमजुती  आढळून येतात. आपला कोलेस्टेरॉलकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे.

आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. शरीरातील हरएक पेशीचे आवरण हे कोलेस्टेरॉलपासूनच बनलेले असते. म्हणूनच आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचा योग्य स्तर असणं हे आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण ठरतं.

शरीरामध्ये ड जीवनसत्व, टेस्टोस्टेरॉन व ईस्ट्रोजन सारखे हार्मोन्स, यांच्या निर्मितीमध्ये कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरात सतत तयार होणारा घटक आहे. आपल्या आहारातून आपण कोलेस्टेरॉल घेतले अथवा घेतले नाही तरी आपल्या यकृताद्वारे आपल्या शरीराची गरज भागविण्यासाठी सतत कोलेस्टेरॉलची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असते.

आपल्या रोजच्या आहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा शरीरातील रक्तामधील कोलेस्टेरॉलचा स्तर वाढण्यावर किंवा कमी होण्यावर किंचितसा परिणाम होत असतो. आपल्या शरीरातील बहुतेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून निर्माण होताना आढळून येतात. कुठल्याही वनस्पतीजन्य तेलामध्ये नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रेरॉल नसते. तर काही किरकोळ प्राणीजन्य पदार्थांमध्ये कोलेस्ट्रेरॉल आढळून येते. पण ते ही नाममात्र असल्याने त्याचा आरोग्याला विशेष धोका नसतो , कारण ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे ह्यापैकी ५०% लोकांच्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचा स्तर योग्य असल्याचे आढळून आले आहे.

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..