आमच्या लहानपणी टाईमपासची
साधने आता इतकी आहेत तितकी नव्हती.
तरीपण खेळणे , अनवाणी भटकणे भरपूर होते.
हे कशावरून आठवले ते आत्ताच मी तिला बघीतले तेव्हा.
आता ती कोण ..
माझ्याकडची ती कोण ..अनेकजण
हल्ली विचारतात ‘ ती ‘ कोण..
खरे तर ती तुमच्या आमच्यात असते ती…ती .
खरे तर मला तिचा लहानपणचा चेहरा नीट आठवत नाही…
चाळीमधल्या त्या गमती आहेत…
खेळाच्या …त्यावेळी
एक खेळ सॉलिड पॉप्युलर होता…
तो अर्थात आमच्यापेक्षा मोठ्या मुलींनी शोधून काढला होता…
अर्थात त्याचे अनुकरण लहानही करत असत..
त्या खेळाचे नाव होते..
‘ डॉक्टर …डॉक्टर …’
त्यावेळी डॉक्टर घरी येऊन तपासात असत..
तेच डोक्यात असे….
मुली मुलांना तपासत …
आणि मुले मुलींना …
आयला त्यावेळी कोण काय तपासत
होते ते आजही आठवत नाही…
आठ दहा वर्षाचे वय असेल..
मुली आमच्यापेक्षा मोठ्या होत्या…
इतके आम्ही भोट होतो…
पण तो खेळ माजघरात किंवा , कोपऱ्यात चाले….
आज तिला बघीतल्यवर आठवले…
कशी आहेस…ती म्हणाली..मजेत…
लहानपणी असेच काही उत्तर ती देत असे..
खूप गप्पा झाल्या आणि..
परत डॉक्टर डॉक्टरचा विषय निघाला..
खरे तर ती माझ्यापेक्षा मोठी होती..
ती म्हणाली…चल रे मला नाही आठवत….
मी म्हणालो , आयला म्हातारी झालीस तरी घाबरतेस..
म्हातारी ..शब्द ऐकल्यावर ती वैतागली..
उगाच बडबडू नकोस….
म्हातारी वगैरे काही नाही….
मी जाम वैताग देत तिला म्हणालो…
तेव्हा ती म्हणाली…
कल्पना कर …काय तपासत असू ..
आम्ही मुली…
मी काय कल्पना करणार…मी हसून म्हणालो..
तशी ती वैतागून विषय बदलत म्हणाली…
चल मी निघते..
सतीश चाफेकर.
Leave a Reply