नवीन लेखन...

मी भिकार्यांचा डॉक्टर

“मी भिकार्यांचा डॉक्टर”

नमस्कार,

1999 साली डाँक्टर म्हणून पास तर झालो…..दवाखाना टाकायला पैसे नाहीत ….. आणि घरातुन पैसे मागायची लाज….पोट भरायचं कसं? काहि दिशा सापडेना ……

अशात खडकवासला परिसरातले एका गावातील वयोवृध्द सरपंच भेटले; म्हणाले, ” दवाखाना कंदिबी हुईल, पाय हायेत ना तुला, आरे भर पिशवीत गोळ्या आन माज्या गावात घरोघरी फिर.मी सांगतो समद्यांना.”

झालं…… तेव्हा खरोखरच दोन पिशव्या भरुन औषधं घेतली……एक पिशवी पाठिवर आणि दुसरी घेतली पोटावर ……पोटासाठी…..!

खडकवासला धरण परिसरातल्या 12 वाड्या आणि 12 खेडी पायपीट करुन पिंजुन काढायचो, …..घरोघरी जावुन ……कोणी पेशंट आहेत का विचारुन गोळ्या द्यायच्या ….पैसे घ्यायचे….पैशाबरोबरच कितिक वेळा अपमानही मिळायचे एकावर एक फ्री……!

काहिवेळा स्वतःची चीड यायची….पण पोटातल्या भुकेला अपमान आणि चीड सुध्दा त्यावेळी गोडच वाटायची.
पण काहिवेळा याच रस्त्यावरून फिरतांना वाटेत कितीतरी भिकारी भेटायचे…..डाँक्टर आहे म्हटल्यावर माझीच विचारपुस करायचे…..आजार सांगायचे ….. गोळ्या घ्यायचे …… आठ आणे / एक रुपया फि सुध्दा मोठ्ठ्या मनाने हसत हसत द्यायचे….विचार यायचा ……भिकारी कोण ? देणारे ते कि घेणारा मी …….???

2017 संपत आलंय, या 17 वर्षात तेच आठ आठ आणे आणि एक एक रुपया साठवुन भरबाजारात स्वतःची दवाखान्याची जागा, फ्लॅट आणि मोठ्ठी गाडी घेतलीये.

पैशाने आज नक्कीच त्या वेळेपेक्शा मोठा झालोय, पण आजही त्या फ्लॅटवर गेलो कि त्या रस्त्यावर भेटलेल्या भिकार्यांचे हसरे चेहरे भिंतीवर दिसतात.कोपऱ्या कोपऱ्यात देणारे ते हात दिसतात.वाटतं, खरंच आपला काय वाटा आहे यांत ….?

गाडीची चाकं पुन्हा त्याच वाटेवर वळतात……

पुर्वीच्या त्या वळणावर आजही भिकारी तसेच तिथेच उभे असतात. पण मी शोधतोय रस्त्यावरची त्यावेळची ती जुनी श्रीमंत माणसं ज्यांनी माझ्यासारख्या भिकार्यांला गाडीत बसवलं…. आणि स्वतः गेली दुसर्यांना आनंद वाटायला.

लायकी नसतांनाही मी येत असतो दरवेळी इथं परतफेड करायला….. पण ती कुठंच नसतात…..कुठंच नसतात…..किती क्रुर चेष्टा !!!

……. आणि मी असतो माझ्या AC गाडीत घामेजुन बसलेला निर्ल्लज्जपणे …..

खरंच मला जमणार आहे का आठ आठ आण्यांची ही त्यांची कर्जं फेडायला……?

वाटतं, कुठल्या फुशारकीने आपण इथे येतो?

खरंच, आजतरी ते आठ आठ आणे फेडण्याची ऐपत आहे आपली ??? …..

आता वाटतं , या 17 वर्षात मी मोठा झालोय कि आणखी खुजा …….?

आता मात्र मला आणखी खुजं नाही व्हायचं माझ्याच नजरेत , आणि म्हणून मी निर्णय घेतलाय; पुन्हा तशाच दोन पिशव्या घ्यायच्या, एक पाठिवर आणि एक पोटावर……एक दिशा धरुन चालत रहायचं…. वाटेत भेटणार्या रस्त्यावर, मंदिराबाहेर जे भिकारी दिसतील त्यांची विचारपुस करुन , आजारी असतील तर तिथल्या तिथे औषधं द्यायची , सेवा करायची अगदी मोफत….

यांच लोकांत ती जुनी माणसं शोधायची…. बघु भेटले तर भेटले, नाहितर कुठुनतरी पहात असतीलंच कि……..

डाँ. अभिजीत सोनवणे

Doctor of Begger

Social Health And Medicine (Soham ) Trust

सोहम ट्रस्ट हि वयोवृध्द व आजारी भिक्षेकर्यांची (ज्यांना घरातल्या लोकांनी बाहेर काढले आहे, आणि भीक मागण्या शिवाय ज्यांच्या कडे दुसरा पर्याय नाही) सेवा शुश्रुषा करुन त्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणारी संस्था आहे.

कारण हे लोक कितीही त्रास असला तरी , पैशाअभावी डॉक्टरांकडे जात नाहीत व वेळेअगोदरच नाईलाजाने त्यांना या जगातुन जावे लागते.

अशा वयस्कर भिक्षेकर्यांचे औषधोपचाराविना वेळेअगोदरच होणारे मृत्यु टाळणे (मृत्युदर कमी करणे) हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

आपणांसारख्या सहृदय लोकांच्या आशिर्वादाने हे काम सुरु आहे.

आपण या कार्यात सहभागी होणार असाल तर संस्थेला आपण अशी मदत करु शकताः

1. एक रुपयाचीही आर्थिक मदत स्विकारली जाईल. (सोहम ट्रस्ट च्या नावे काढलेल्या चेकने- कँश स्वरुपात नाही)
आपण दिलेल्या मदतीतुन बीपी , डायबेटिस, यासारख्या कायमस्वरुपाच्या आजारांवर लागणारी ॲऔषधे (जी वर्षानुवर्षे द्यावी लागतात ) रुग्णांस मोफत पुरवली जातील.

2. आपणांकडे चालु स्थितीत असणारे कोणतेही वैद्यकीय उपकरण उदा. बीपी मशीन, स्टेथोस्कोप, ग्लुकोमीटर , थर्मामीटर अथवा कोणतेही इतर उपकरण ज्याचा उपयोग रुग्ण तपासण्यासाठी होईल , ते देवु शकता.

3. आपणांस नको असणारी व Expiry Date न संपलेली औषधे आपण ट्रस्टला देवु शकता.

4. कुबड्या , वॉकर, कमोड चेअर यांसारख्या वस्तु.

5. संस्था चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्यां गोष्टी उदा. जुने टेबल , खुर्ची, computer , printer, आँफिस स्टेशनरी अथवा तत्सम बाबी संस्थेला देवु शकता.

6. डॉक्टरांना मदत म्हणुन प्रत्यक्ष जागेवर येवुन या वयस्कर भिक्षेकरी रुग्णांची सेवा शुश्रुषा (जखमा स्वच्छ करणे , ड्रेसींग करणे ) यासारख्या कामात डॉक्टरांना मदत करु शकता.

7. याव्यतीरीक्त आपणांस जे शक्य असेल ते…. !!!

8. वरील पैकी काहीही शक्य नसेल तरीही आपण फक्त आलात आणि यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोललात तरी ती ही लाखमोलाची मदत ठरेल, कारण यांना फक्त भिक नकोय, त्यांना हवंय प्रेम आणि माया

ज्यावेळी आपण कोणतीही मदत करता, त्यावेळी ही मदत आम्ही आपले नाव त्यांना सांगुन आपल्या नावे त्यांच्यापर्यंत पोचवतो.. ज्यावेळी आम्ही या वयस्कर लोकांना आपलं नाव सांगतो , त्यावेळी खरोखरीच हृदयापासुन त्यांनी तुम्हाला दिलेला आशिर्वाद ऐकुन आणि पाहुन असं वाटतं, ज्यांनी हि मदत दिली आहे , ते खरोखर आज इथे हवे होते हे सर्व पहायला !!!

आपण दिलेली मदत नेमकी कोणापर्यंत पोचली आहे याचे सर्व डिटेल्स आम्ही मदतकर्त्यांना पोचवतो जेणेकरुन आपण त्या व्यक्तिशी परस्पर संवाद साधु शकता, आणि हेच वैशिष्ट्य आहे सोहम ट्रस्टचे !!!

डॉ. अभिजीत सोनवणे म्हणजेच Doctor For Beggar यांना आपण संपर्क करु शकता 9822267357 या नंबरवर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..