डोक्यावरचे केस जाणे आणि त्यावरील उपाय :
ह्याची कारणे आहेत – अ) डोक्यावर तेल न लावणे ब) शरीरात जास्त प्रमाणात उष्णता वाढणे क) व्यायामाचा अभाव.
उपाय:
योग आणि कसरती – १) ‘ओम’ चा जप करणे. २) सर्वांगासन करणे. ३) उष्ट्रासन करणे. ४) सुप्त वज्रासन करणे. ५) अंतरमनाने पाहण्याचा सराव करणे. यासाठी सुखासनामध्ये बसा. डोळे बंद करा. डोक्याच्या भागाची कल्पना करा. तसेच तुमच्या डोक्यातील अतिरिक्त उष्णता बाहेर गेल्याचीही कल्पना करा. इतकेच नव्हे तर अशी देखील कल्पना करा कि तुमचे केस फारच सुंदर आणि मुलायम आहेत. तुमच्या टकलावर केस आले आहेत. असे रोज १० मिनिटे करा. तुमच्या डोक्यावर केस आल्याचे जाणवू लागेल.
प्रकार दुसरा : डोक्यावर जेथे केस नसतील अशा ठिकाणची त्वचा ताणून धरा आणि तेथे केसांच्या मुळाना मुळयाचा रस लावा. हे झोपण्यापूर्वी करा. त्यामुळे तो रस सर्वत्र डोक्यावर पसरून जेथे केसाच्या मुलांना अवरोध निर्माण झाला आहे तेथून तो आतमध्ये पाझरून केसांची मुले जी अवरोधित झालेली आहेत, त्यांना मोकळे करण्यास मदत करेल. सकाळी उठून आयुर्वेदीक शाम्पूने स्नान करा. यामुळे देखील पून:च्च केस येण्यास मदतच होईल.
किंवा २ थेंब शिसम तेल नाकपूडयांमध्ये सोडा आणि स्वास घ्या. यामुळे बंद झालेली केसांची मुळे उघडण्यास मदत होवून केस पूनःच्च येण्यास मदत होते.
डोक्याचे मालीश करण्याचे कार्य प्रत्येक १५ दिवसांनी करा आणि त्यावेळेस पुन्हा मूळयाचा रस लावा, नाकपुडीतून शिसम तेल सोडा, श्वासोच्छ्वास करा. अशाप्रकारे तीन ते सहा महिन्यांमध्ये टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवत असल्याचे दिसू लागतात.
प्रयोग तिसरा: कलाबंद केसांचे तेल वापरणे: यासाठी कलाबंद गुज्जू पाव किलो घ्या. शुध्द खोपरेल तेल पाव किलो
घ्या. दोन्ही तेले एकत्र करा आणि मंद आचेवर तेल शिल्लक राहीपर्यंत गरम करा. खाली उतरण्यापूर्वी त्यामध्ये पसाभर मारवा किंवा दवणा घाला. हे घातल्यानंतर ती पाने काळी पडण्यापूर्वी मंद आच बंद करा. ते तेल गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा.
वापर: हे तयार झालेले तेल रोज वापरा. ज्यांना केसांच्या तक्रारी आहेत, अशानि ते तेल कोमट स्वरूपात वापरा आणि ते डोक्यामध्ये मुरवा.
लाभ: केसांची मुले बळकट होतील, डोक्यातील जास्त प्रमाणात असलेली उष्णता कमी होईल, तर शिरा सुद्धा थंड होण्यास मदत होईल. यामुळे केस पिकणे, टक्कल पडणे, डोक्यात कोंडा होणे इत्यादी प्रकार थांबण्यास मदत होईल.
प्रकार चौथा: १) जठामांसी : १०० ग्राम २) चेन्गल्वा कोस्तु : १०० ग्राम ३) काले शिसम : १०० ग्राम ४) सुगंध फळ मुळ : १०० ग्राम ५) तमारा गीन्जलू : १०० ग्राम
हे सगळे एकत्र करून थोड्या पाण्याने वाटा आणि त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये ५०० ग्राम गाईचे तूप घाला आणि मंद आचेवर उकळा. नंतर तूप शिल्लक राहीपर्यंत उकळून झाल्यावर ते गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा आणि वापरा.
वापर: हे तयार झालेले तूप रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस वापरा. लाभ: टक्कल पडण्याचे प्रमाण कमी होईल.
प्रकार पाचवा:
टकलावर उपाय: डोक्यावर ओला फडका गुंडाळा. त्यावर एक सुखा कपडा गुंडाळा. त्यानंतर जाडसर असा दुसरा फडका गुंडाळा. त्यामुळे डोक्यातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होवून, केसांची मुले पून्हा उघडी होण्यास हातभार लागेल.
नस्य कर्माने निम तेल किंवा राईचे तेल वापरा.
केस तेल आठवड्यातून दोन वेळा वापरा. त्यासाठी भृंगराज किंवा कलाबंद तेल किंवा उसिरिका किंवा खोप्रेल तेल वापरा. हि तेले मुलापर्यंत जातील. त्यांचा मुलांना हळूवार मसाज करा. नंतर त्यावर एक कपडा गुंडाला. सकाळी शिकेकाईने डोके धुवून टाका किंवा आयुर्वेदिक शाम्पूने डोके धुवा.
त्रिफळ (तानिकाया, उसरीकाया, काराकाया) ह्या तिघांचे पाच तुकडे घेवून पानामध्ये रात्रभर बुडवून ठेवा. सकाळी गाळलेले पाणी डोक्याला लावा आणि केस विचरा. असे बरेच दिवस केल्यावर आपणास असे दिसून येईल कि केस गळण्याचे थांबलेले आहे आणि केस पुन्हा उगवत आहेत.
टक्कल पडलेल्या जागेवर कांद्याचा रस हळूवार लावून मसाज केल्यास व तो रस सुकल्यावर वरीलप्रमाणेच परिणाम दिसून येवू शकतात. याशिवाय कांद्याच्या बीजाची पावडर करून व ती पाण्यात एकत्रित करून डोक्यावर लावून सुकू द्यावी ती सुकल्यावर नंतरच स्नान करा. वरीलप्रमाणेच परिणाम दिसून येवू लागतील.
प्रकार सहावा: बुरूगु जीगुरू (गम), नीला ताडी दूम्पुलू आणि तमारा गीन्जुलू हे सगळे एकाच प्रमाणात घेवून, त्यांचे तुकडे करा. त्यांना सुकवा. त्याची पावडर करा. ती भरून ठेवा. ज्यावेळी ती पावडर वापरावयाची असेल त्यावेळी ती पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि टकलावर लावा. एक तासानन्तर ती धुवून टाका. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा आणि पहा आपले केस पुन्हा येण्यास सुरुवात होते कि नाही ते.
(विशेष सूचना: वरील उपाय योजना ह्या आंतरजालावरून घेण्यात आलेल्या माहितीच्या आधारे घेण्यात आलेल्या असून, त्याबद्दल लेखक जबाबदार नाही. तरी, आपल्या जबाबदारीवर ते उपाय करावेत. त्यापासून लाभ न झाल्यास त्याची जबाबदारी लेखकाची नाही.)
— मयुर तोंडवळकर
माझे अध्रे जास्त आहेत.पण आता माझे केस जास्त प्रमाणात जात आहेत.