डोळे अर्धोन्मीलित,
स्वप्नात रंगलेले,
पापण्यांचे निमुळते काठ,
आसवांत भिजलेले ,–!!!
कळी अर्धोन्मीलित,
पाकळी कशी उमले,
पानांचे भोवती राज्य,
सुगंधाने भारलेले,–!!!
तन अर्धोन्मीलित,
तारुण्याने मुसमुसलेले,
चहूकडून फुलत,
यौवनाने भरलेले,–!!!
काव्य अर्धोन्मीलित,
पण अर्थगर्भतेने,
मनात राज्य करत,
नवरसांनी भरलेले,–!!!
सृष्टी अर्धोन्मीलित,
चरांचरांत पसरलेले,
जीवनदायी संजीवन,
जिथे तिथे मुरलेले,–!!!
प्रेम अर्धोन्मीलित,
हृदय भरलेले,
मनातील राजकुमार,
अंतरी वसलेले,–!!!
पहाट अर्धोन्मीलित,
सोनसळी प्रकाशाचे,
*धरेचे उमलते फूल,
उजेडाचे रांजण सांडले*,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply