मी बागेत लावलेल्या गुलाबाला कळी आली तेव्हा पासून रोज ती कधी उमलेल कशी दिसेल याची उत्सुकतेने वाट पाहत होते आणि आज सकाळी पाणी घालताना ते सुंदर गुलाबी गुलाब फूललेले पाहून जो आनंद झाला होता तो अवर्णनीय आहे. लांबूनच मी पहात होते व विचार करत होते. आता या फुलाचं काय करायचे? पहिल फूल फळ देवाला अर्पण करतात. म्हणून आता हे फूल हळुवार तोडून देवाची पूजा करून वाहू या असे मनात ठरवले तोच शाळेत जाणाऱ्या दोन मुली तिसरी. चौथ्या इयत्तेत शिकत असलेल्या तिथेच थबकून गुलाबाकडे अमिनिष डोळ्यांनी पहात होत्या. मला माहित आहे की अशी काही माणसं असतात. न विचारता दुसर्यांच्या बागेतील फुले घेऊन जातात. म्हणून मी तिथेच थांबले. पैकी एक म्हणाली तू थांब इथे मी आणते ते फूल. तशी दुसरीने तिला आडलले आणि म्हणाली.माझी आई म्हणते की न विचारता घेणे म्हणजे चोरीच असते. पहिली म्हणाली की आपण विचारुन घेउ या. बालमनाचे कौतुक वाटले. आणि मी त्यांना हाक मारली तशी पहिली घाबरून पळून गेली. आणि दुसरीला मी जवळ बोलावले व तिच्या दोन वेण्या पैकी एका वेणीवर हेअर पिन मध्ये खोचून दिले आणि तिला घरात नेऊन आरशात बघायला सांगितले. तशी कळी खुलली आणि गुलाबा सारखे गोड हस फुलले मग तिला एक चॉकलेट दिले व तिला म्हटलं चल मी तुला सोडवायला येते. मला तिच्या आईला भेटायचे होते जिने एवढे चांगले संस्कार तिच्या वर केले आहेत तिला आनंद झाला होता. तिच्या घराच्या बाहेर थोड्या अंतरावर उभी राहिले तोच ती माझा हात सोडून आईकडे धावत गेली आणि वेणीतील गुलाब दाखवून आईला म्हणाली मी फूल तोडले नाही मला काकूनेच स्वतं:च्या हाताने तोडून घातले आहे आणि तिच्यात व मैत्रीणीतील बोलणे सांगितले होते ते ऐकून आईच्या चेहरा समाधानाने आणि मुलीच्या चेहर्यावर आनंदाचे असे दोन गुलाब दोघींच्याही गालावर फुललेले होते.
मी विचार करत होते की आईची शिकवण व संस्कार याची जाण ठेवणारी मुलगी व गुलाबाचे फूल देऊन न फसवणारा. आणि विश्वास घात न करणारा मुलगा ज्या घरात केवळ आईच्या संस्कारामुळे असे निभावेल असा मुलगा घरोघरी असेल तोच दिवस खऱ्या अर्थाने रोझ डे म्हणजे गुलाब दिन असेल. आणि मला आता जाणवल आहे की देवाला फूल वाहून जे पुण्य मिळाले असते तेवढेच आता हे सगळं पाहून मिळाले आहे.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply