१९३४ साली प्रसिद्ध चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वॉल्ट डिज्नी यांच्या कल्पनेतून डोनॉल्ड डकची निर्मिती सुचली. चित्रकार डिक लूंडी यांनी डोनाल्ड डकची प्रतिमा चित्रित केली होती. डकचे अन्य साथीदार मिकी माऊस, मिनी माऊस, डेजी डक व प्लुटो शुमार हे होते. नेहमीच एक टोपी आणि सेलर सूट घालणारा डोनाल्ड डक ९ जून १९३४ रोजी पहिल्यांदा द वाइस लिटिस हेन या कार्टून कार्यक्रमात दिसला.
या कार्यक्रमाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. मिकी माऊस सोबत डोनाल्डची जोडी जमल्यानंतर त्याने लोकप्रियतेचा टप्पा गाठला. प्रसिद्ध कलाकार क्लेरेंस डकी नेशने डोनाल्ड डकला आपला आवाज दिला. त्यामुळे डोनाल्ड डकला एक वेगळीच ओळख मिळाली.
१९८५ मध्ये नेश यांनी यातून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर टोनी एन्सेल्मो यांनी डोनाल्डला आपला आवाज दिला. यासाठी नेश यांनी टोनी यांना प्रशिक्षण दिलं होतं.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply