मला अजुनही समजले नाही
मला तुझीच आठवण कां येते…
तुच सदा माझ्या मनी लोचनी
हे कसले, आपुले अगम्य नाते…
मी, नित्य इथे संभ्रमात जगतो
अस्तित्व तुझे सभोवार भासते…
ऋणानुबंध जरी हे गतजन्मांचे
मग हे दुरत्व कां मनास छळते…
कसले प्रेम? कसल्या भावनां
कां? व्यर्थ सारे, जगणे वाटते…
तोच एक कर्ता आणि करविता
त्यालाच सारे विचारावेसे वाटते…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४९
२७/९/ २०२२
Leave a Reply