।।एकदन्ताय नम: बृहतीपत्रं समर्पयामि ।।
वांग्याच्या क्षुपाप्रमाणे दिसणारे हे १-२मीटर उंचीचे काटेरी क्षुप असते.ह्याची पाने ७-१५ सेंमी लांब असतात व मागील बाजुस शिरेवर काटे असतात.फुले निळा असतात व मंजीरी स्वरूपात असतात.फळ हे गोल १ सेंमी व्यासाचे कच्चे असताना हिरवे पांढरी रेघ असलेले व पिकल्यावर पिवळे होते.बी स्निग्ध ०.०५ सेंमी व्यासाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग मुळ व फळ असते.
हे चवीला कडू तिखट असून उष्ण गुणाचे तसेच हल्के,रूक्ष व तीक्ष्ण गुणाचे असते.हे कफवातनाशक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग पाहूयात:
वेदना असलेल्या भागावर ह्याचा लेप करतात.
चाईवर मधासोबत ह्याचा लेप केला जातो.
उल्टी होत असल्यास मध व गाईच्या तुपासह हिच्या फळाचा रस घ्यावा.
डोरलीचे मुळ सर्दी,खोकला,दमा,ह्यात उपयुक्त आहे.
बियांचा उपयोग स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये होतो जसे पाळी वेळेत न येणे,स्त्राव कमी होणे इ.
वेगवेगळ्या त्वचा विकारात हिचा उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
डोरली/बृहती बद्दल खुप छान माहिती मिळाली ताई मनःपूर्वक आभार
आचार्य बालकृष्ण यांचा एक विडिओ पाहिल्यावर या वनस्पतीचे मराठी नाव जाणून घेण्यासाठी सर्च केले असता. तुमचे आर्टिकल वाचण्यास मिळाले. बरीच माहिती समजली.
मनापासून धन्यवाद ??