या सगळ्यांचे लेख वाचल्यावर मनात एकच एक भाव निर्माण होतो तो म्हणजे डॉ. अनिरुद्ध जोशींना जगातील कुठल्या क्षेत्राची उत्तम जाण, समज, व माहिती नव्हती असे नाही आणि त्यांनी त्यात प्राविण्यही मिळवले होते, बक्षीसं मिळवली होती, स्वत: ते सगळ्या कला जगले. डॉ.अनिरुद्ध जोशी हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्त्रोत, माहेरघर व विद्यापीठ आहेत अशी माझी पक्की खात्री झाली आहे कदाचित अजून काही आपल्या ज्ञात अज्ञात असतील.
एकंदरच सर्व लेख वाचल्या नंतर प्रथम मनात विचार येतो की जोश्या पासून डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. श्रीराम, अम्बज्ञ.
— जगदीश पटवर्धन