नवीन लेखन...

ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर

ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४२ रोजी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे झाला. आशालता करलगीकर यांची कारकिर्द हैदराबाद शहरात बहरली. वडील वकिली व्यवसायानिमित्त हैदराबादेत स्थायिक झाले होते. संगीत महामहोपाध्याय पंडित स. भ. देशपांडे, डॉ. एन. के. कऱ्हाडे, पंडित व्ही. आर. आठवले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. देशभरात शास्त्रीय गायनाचे त्यांनी दोन हजार कार्यक्रम केले. तेलुगू आणि हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. मात्र, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत त्या अधिक रमल्या.

पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, लता मंगेशकर, मोहमद रफी आदी मान्यवरांसमोर त्यांनी आपली कला सादर करून प्रशंसा मिळविली होती. १९६३ साली अफगानिस्तान मधील काबूल येथे पं. भीमसेन जोशी, पं. सामताप्रसाद, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान अशा नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. भक्तीरसात ओथंबलेले गायन ऐकून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना आंध्रलता म्हटले. हीच उपाधी पुढे त्यांची ओळख झाली. विविध पुरस्कारांनी करलगीकर यांना सन्मानित करण्यात आले होते. शास्त्रीय संगीतात संथ ख्याल गायन त्यांच्या विशेष आवडीचे होते. सुगम गायन, भक्तिगीत, दादरा, गझल या प्रकारातही त्यांनी योगदान दिले. आशालता करलगीकर यांच्यासोबत देशभर गझल मैफली केल्या.

आशालता यांचे शास्त्रीय आणि सुगम गायकीवर प्रभूत्व होते. मराठवाड्यातील नवीन पिढीतील गायकांना आशालता यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मनमिळावू स्वभावाच्या करलगीकर यांचा चाहतावर्ग मोठा होता. विमा कंपनीत नोकरी सांभाळून त्यांनी संगीत सेवा केली. नवीन गायकांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक मैफलीला त्या आवर्जून उपस्थित असत. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या आशालता करलगीकर यांच्याविषयी तरुण कलावंतांमध्ये अतिशय आदराचे स्थान होते. त्यांच्या आवाजातला ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ हा एकनाथ महाराजांचा मराठी कूट अभंग प्रसिद्ध आहे. प्रत्येक मैफलीत हा अभंग त्या नेहमी गात.

आशालता करलगीकर यांना सूरमणी, सुरश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. भारतात संगीत क्षेत्रात अखिल ३ राष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या त्या पहिल्या गायिका होत्या. अफगाणिस्तानातील काबूल शहरात ११ कार्यक्रम त्यांनी केले होते. डॉ. आशालता करलगीकर यांचे २९ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..