डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा जन्म २५ जानेवारीला झाला.
डॉ.जगन्नाथ दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाली असून अनेक जणांनी त्याचं अनुकरण सुरु केलं आहे.
डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
शारीरिक स्वास्थ्याचं आहाराशी असलेल्या नात्याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरु आहे. २०१८ मध्ये राज्य सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून डॉ. दीक्षित यांची नियुक्ती केली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply