ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म १६ नोव्हेंबर, १९२८ रोजी झाला.
डॉ. निर्मलकुमार फडकुले हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे वडील न्यायतीर्थ, पंडित जिनदासशास्त्री फडकुले हे संस्कृत विद्वान होते. निर्मलकुमार फडकुले यांच्या “लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व” ह्या संशोधन प्रबंधास डॉक्टरेट मिळाली होती. त्यांनी नांदेडमध्ये (इ.स.१९५४ ते५५ या काळात) व नंतर संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले.
ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची “आस्वाद समीक्षा” साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला होता. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे नाव सोलापुरातील एका सभागृहाला देण्यात आले आहे.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे २९ जुलै २००६ रोजी निधन झाले. डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फे २००७ सालापासून दरवर्षी साहित्यातील व समाजसेवेतील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply