डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. त्यांचा जन्म ११ आक्टोबर १९६९ रोजी झाला. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली निशिगंधा वाड या १९८५ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत पहिल्या पन्ना्सात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्यान आल्या होत्या.
१९९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. काळाच्या बंधनास न जुमानणारं लावण्य, सौंदर्य खचितच ज्या व्यक्तिंवर मेहरनजर करतं, त्यांपैकी एक म्हणजे निशीगंधाजी. १९९० च्या सुमारास व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. गालावरल्या त्या दोन खळ्यांनी कित्येक श्वासांचे लगाम खेचले असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
२००३ मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. नंतर निशीगंधा वाड यांना कोलंबिया विद्यापीठाने डी. लिट. पदवी दिली आहे. निशीगंधा वाड. एक सालस, चिकित्सक, अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी काही मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर शंभरहूनही अधिक चित्रपट त्यांच्या नावे आले. ‘शेजारी-शेजारी’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘एकापेक्षा एक’, ‘प्रतिकार’, ‘सासर माहेर’, ‘अशी ही ज्ञानेश्वरी’ यांसारखे मराठी तसेच ‘सलिम लंगडे पे मत रो’, ‘कर्म योद्धा’, ‘दादागिरी’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ यांसारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले. ‘कुलवधू’ (मराठी) व ‘झी हॉरर शो’ (हिंदी) यांसारख्या मालिकाही त्यांनी केल्या.
अभिनयासोबतच एक उत्तम लेखिका म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी लिहीलेल्या पाच पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. मराठी व ब्रिटीश रंगभूमी व चित्रसृष्टीतील दृष्टीकोनातून स्त्रियांची समाजातील बदलती भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठात त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या विद्वत्तेचीही ग्वाही देते. रिलीजीयस हार्मनी फाऊंडेशन निर्मित धार्मिक सलोखा या विषयावरील व्याख्यानपटाच्या त्या व्याख्यात्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
Leave a Reply