समाजसेवक प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र. डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९४८ रोजी झाला.
गडचिरोली जिल्हयाच्या पूर्वेला छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागडच्या निबीड अरण्यात ४३ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९७३ ला कर्मयोगी बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. अज्ञान, अंधश्रद्धा, मागासलेपणा, निरक्षरता यांच्या गर्तेत सापडलेल्या आदिवासींना प्रकाशमान करण्यासाठी डॉ.प्रकाश आमटे लोकबिरादरी प्रकल्पाचे काम हाती घेतले. भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे. आदिवासींना, रंजल्या-गांजल्यांना आपुले म्हणणारा, अनाथ, अपंगांना ह्दयाशी धरणारा आणि मुक्या व हिंस्त्र प्राण्यांना प्रेमाची भाषा शिकविणाऱ्या डॉ.प्रकाश आमटे यांनी मागासलेल्या आदिवासींमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण केले.
लोकबिरादरी आश्रमशाळेतून बाराखडी गिरविलेले अनेक माडिया तरुण डॉक्टर, अभियंते, वकील झाले. मा.बाबा आमटे त्यांना डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सुरु केलेल्या सेवाकार्याचा वसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील डॉ.दिगंत आमटे, अनिकेत आमटे व त्यांच्या सहचारिणी पुढे चालवीत आहेत.
२००८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे. जनसेवेत समर्पित असलेले डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट ०१४ साली प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत.
याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आला आहे. फ्रान्सजवळील मोनाको या राज्यांनी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित करुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहिती http://www.lokbiradariprakalp.org/ या वेबसाईट वर मिळू शकते.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply