उत्त्तर प्रदेशातील गाझीपुर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२७ रोजी झाला. डॉ. राही मासूम रझा महाविद्यालयीन शिक्षण अलीगढ विद्यापीठात झाले. १९६४ साली त्यांना पी.एच.डी. मिळाली. नंतर काही काळ ते अलीगढ विद्यापीठात शिकवत होते. १९६८ साली ते मुंबईला आले. आपल्या साहित्य कृती बरोबरच ते हिंदी सिनेमाला जोडले गेले. डॉ. राही मासूम रझा यांनी अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मालिकांचे संवादही लिहिले. दूरदर्शन साठी १०० हून अधिक धारावाहिक त्यांनी लिहिल्या त्यातील ‘महाभारत’ और ‘नीम का पेड़’ या अविस्मरणीय होत्या. “महाभारत” या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक म्हणूनही डॉ.राही मासूम रजा यांनी काम केले. “महाभारत” बनवायच्या आधी डॉ. राही मासूम रझा यांनी बी.आर.च्या बॅनरखाली संवादलेखक म्हणून पूर्वीही काम केलं होतं. बी आर चोप्रा यांनी “महाभारत”ची कल्पना जेव्हा डॉ. राही मासूम रझा यांना सांगितली. आश्चर्य म्हणजे डॉ. राही मासूम रझा केवळ चोवीस तासातच, ‘समय अथवा काळालाच आपण महाभारताचा सूत्रधार केला तर?’ अशी एक भन्नाट व अभिनव कल्पना घेऊन चोप्रांकडे आले, इतकंच नव्हे तर त्यांनी महाभारताच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रधाराचं निवेदनही लिहून बरोबर आणलं होतं. मा.चोप्रांना डॉक्टरांची कल्पना विलक्षण आवडली आणि त्या दिवशी प्रथम चोप्रांना समजलं की, डॉ.राही मासूम रझा हे नुसतेच पटकथालेखक नसून संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत. चोप्रांनी त्या क्षणापासून डॉक्टरांना महाभारताचे कथालेखक म्हणून आपल्या टीममध्ये सन्मानाने सामावून घेतलं. मा.राही आपल्या एकूण यांनी ३०० चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या तसेच कविताही लिहिल्या आहेत. निमका पेड या कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्य पूर्व भारत व आताचा भारत याचे वर्णन केले आहे. आधा गाव, उसकी बुंद वगैरे त्यांचे चित्रपट गाजले. “तिलिस्म -ए -होशरुबा” हा त्यांचा कथा संग्रह आहे. आधा गाँव, नीम का पेड़, कटरा बी आर्ज़ू, टोपी शुक्ला, ओस की बूंद और सीन अशी ७५ प्रसिद्ध पुस्तके आहेत. १९७९ मध्ये ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ या चित्रपटासाठी फिल्म फेयरचा सर्वश्रेष्ठ संवाद पुरस्कार डॉ. राही मासूम रझा यांना मिळाला होता. भारत सरकारने ’पद्मश्री’ , पद्म भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे चिरंजीव नदीम खान हे सिनेमेटोग्राफर आहेत. डॉ.राही मासूम रजा यांचे निधन १५ मार्च १९९२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ. राही मासूम रझा यांची रामजन्म भूमी वरील कविता
“लेकिन मेरा लावारिस दिल”
मस्जिद तो अल्लाह की ठहरी
मंदिर राम का निकला
लेकिन मेरा लावारिस दिल
अब जिस की जंबील में कोई ख्वाब
कोई ताबीर नहीं है
मुस्तकबिल की रोशन रोशन
एक भी तस्वीर नहीं है
बोल ए इंसान, ये दिल, ये मेरा दिल
ये लावारिस, ये शर्मिन्दा शर्मिन्दा दिल
आख़िर किसके नाम का निकला
मस्जिद तो अल्लाह की ठहरी
मंदिर राम का निकला
बंदा किसके काम का निकला
ये मेरा दिल है
या मेरे ख़्वाबों का मकतल
चारों तरफ बस खून और आँसू, चीखें, शोले
घायल गुड़िया
खुली हुई मुर्दा आँखों से कुछ दरवाजे
खून में लिथड़े कमसिन कुरते
जगह जगह से मसकी साड़ी
शर्मिन्दा नंगी शलवारें
दीवारों से चिपकी बिंदी
सहमी चूड़ी
दरवाजों की ओट में आवेजों की कबरें
ए अल्लाह, ए रहीम, करीम, ये मेरी अमानत
ए श्रीराम, रघुपति राघव, ए मेरे मर्यादा पुरुषोत्तम
ये आपकी दौलत आप सम्हालें
मैं बेबस हूँ
आग और खून के इस दलदल में
मेरी तो आवाज़ के पाँव धँसे जाते हैं।
Leave a Reply