नवीन लेखन...

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ९

रोनॉल्ड रॉसच्या मलेरियासंबंधीत काव्यरचना

रोनॉल्ड रॉस कवी- मनाचा असल्याने काही प्रसंगी अतिशय हळवा होत असे. त्याने अनेक कविता लिहील्या. त्यातील मलेरियाच्या संशोधनासंबंधीत दोन कविता येथे देत आहे.

मलेरियाच्या संशोधनकार्यात ज्यावेळी अनेक अडथळे येत गेले, डासांचा, माणसांचा व मलेरिया परोजीवांचा परस्पर संबंध उलगडत नव्हता त्यावेळी रॉस चिंताग्रस्त झाला. त्याच सुमारास त्याला स्वत:ला मलेरियाचा रोग झाला. त्याच्या दु:खी, उदास मनात काहूर माजले. अशा मनस्थितीत त्याला सुचलेली ही कविता त्याच्या भावना व्यक्त करीत आहे.

Solitude
What ails the solitude
Is this the judgement day?
The sky is red as blood
The very rock decay
And crack and crumble and
there is a flame of wind
where with the burning sand
is ever mass’d and thin’d
The world is white with heat
The world is rent and riven
The world and heaven meet
the lost stars cry in heaven

स्वैर अनुवाद:

एकांतवास
एकान्तवासाचे दु:ख असह्य होत आहे आज निकालाचा दिवस तर नसेल? आकाशातील प्रभा रक्तवर्णी झाली आहे, खडक फुटून असंख्य भेगा पडत आहेत पहाडांचे कड्यांमागून कडे कोसळत आहेत झंझावाताचा डोंब उसळला आहे तप्त वाळू भाजून काढते आहे लाही लाही उन्हाने जमीन पांढरीशुभ्र होत आहे भगदाड पडून पृथ्वीचे तुकडे तुकडे होत आहेत जणू पृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन घडत आहे आणि… हरवलेले तारे स्वर्गात आक्रोश करीत आहेत.

ज्या दिवशी डासाच्या विच्छेदनातून मलेरियाच्या परोपजीवांची अंडी दिसली तो सोनेरी क्षण रॉसने कवितेच्या माध्यमातून साकारला. जगभरात तो दिवस Mosquito Day – 20 Augest म्हणून साजरा केला जाऊ लागला. स्वत:च्या या विजयाचा आनंद प्रगट करणारी रॉसची ही कविता पुरेशी बोलकी आहे.

Exile
The day relenting God hath placed. within hand a wonderous thing And God Be praised at his command seeking his secret deeds with tears and toiling breath, I find thy cunning seeds O, million murdening death, I know this little thing Amyriad men will save O death where is thy sting, thy victory O Grave

स्वैर अनुवाद:
हद्दपार
पाझर फुटून देवाने हाती दिला हा सोन्याचा दिवस ईश्वरा, तुझी किती प्रशंसा करू
तुझ्या आज्ञेवरून शोधू शकलो मी तुझे गुप्त रहस्य, त्यासाठी अथक परिश्रम करून व डोळ्यात अश्रू आणून कौशल्याने शोधल्या मी त्या कपटी कावेबाज परोपजीवरूपी बिया, हे लक्षावधी प्राण घेणाऱ्या मृत्यूदेवा, मला गवसली ही छोटीशी गोष्ट वाचतील त्यामुळे असंख्य माणसांचे प्राण हे मृत्यो, कुठे गेला तुझा डंख, तुझा विजय कारण….मी आहे थडग्यावर फडकवली विजयाची माळा !

–डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..