लंडन येथून भारतात बोटीने येत असताना रॉस बोटीवरील प्रवासी , वाटेवरील बंदरांवर चे खलाशी यांचे रक्ताचे नमुने का चट्ट्यांवर घेऊन मायक्रोस्कोप खाली सतत न्याहाळत राही . डासांचे विच्छेदन आत्मसात करण्याकरिता प्रथम त्याने अनेक झुरळांवर विच्छेदनाचे प्रयोग केले. भारतात आल्यावर ताप असलेल्या अनेक रुग्णांचे रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन ते तपासण्याचा सपाटाच लावला. परंतु रॉसच्या या रक्ततपासणीच्या अट्टाहासापायी रुग्ण घाबरायला लागले. रॉसचे सह-अधिकारी या तापाचा रुग्णांना त्याच्यापासून लपवून ठेवू लागले. शेवटी तर दिवस-रात्र रक्तातील परोपजीवी शोधण्याकरिता रॉस हॉस्पिटल मागून हॉस्पिटल अशा भेटी देता पाचे देत तापाचे रोगी शोधू लागला. भारतातील गरीब जनतेला पैशाची लालूच दाखवीत त्याने प्रत्येक रुग्णाला रक्त घेण्याबद्दल चार आणि स्वतःच्या खिशातून देण्यासही सुरवात केली.
आता माणसांची सूचना शिरोधार्य मानून त्याने संशोधनाची रूपरेषा खालील प्रमाणे मांडली व पुढे अमलात आणली . ती अशी
१) मलेरियाग्रस्त रुग्णांना स्वतंत्र बंद खोलीत वॉर्डमधील इतर रुग्णांना पासून दूर ठेवले . त्यातून पकडलेल्या डासांची फौजदार त्यांच्यावर चालवण्याकरिता सोडली पूर्णविराम नंतर पद्धतशीरपणे त्या डासांना पुन्हा पकडून त्यांचे विच्छेदन करून पाहण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु सुरुवातीलाच अपयश पदरात आले कारण ठेवण्याकरिता आणले होते ते रुग्णांना चावले नाहीतच परंतु रॉसला ही चावले नाहीत.
२) वरील अयशस्वी प्रयोगानंतर पुन्हा निराळ्या जागेतून नवीन डासांची फौज डबक्यातील पाण्यात सोडण्यात आली. तेथे त्यांनी टाकलेल्या अंड्यातून बाहेर पडलेल्या डासांची संख्या भरपूर वाढली. यानंतर मलेरियाच्या रुग्णांवर ह्या नव्या डासांची कुमक त्यांना चावण्यासाठी वापरण्यात आली.
ज्या रुग्णांच्या रक्तामध्ये क्रिसेंट स्थितीतील परोपजीवी दिसत होते यांना मच्छरदाणी झोपवून ही नवीन डासांची ताज्या दमाची कुमक त्यांच्यावर सोडण्यात आली.
या डासांनी रुग्णांचे रक्त शोषल्यानंतर त्या डासांच्या शरीर विच्छेदनातून त्यातील द्रावाचे नमुने तपासले तेव्हा रुग्णातील रक्तात आढळून आलेले क्रिसेंट जसे दिसत होते तंतोतंत तसेच ते द्रावातही दिसून आले.
हाच प्रयोग परत केल्यावर यावेळी मात्र डास विच्छेदनात डासांच्या जठराच्या बाह्या आवरणावर परोपजीवांची पुढील स्थिती असलेले पांढरे ठिपके दिसत होते. रॉस आनंदाने हर्षभरित झाला व तत्काळ त्याने मॅन्सनकडे अहवाल पाठवला.
मॅन्सनचा पहिला सल्ला होता की हा अहवाल गुप्तच ठेवावा. इटालियन व फ्रेंच शास्त्रज्ञांना याचा सुगावा लागल्यास ते बेधडकपणे संशोधन आम्हीच केलेले आहे अशा रीतीने स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करून श्रेय त्यांच्याकडे घेतील.
मॅन्सनचा दिलेला पुढचा सल्ला ही तर एक मोठी घोडचूक होती. त्याने ठामपणे आपलाच डास सिद्धांत यापुढेही अमलात आणावा असे बजावले. विच्छेदनात क्रिसेंट आढळलेले डास पाण्याच्या बाटलीत बंद करून ठेवा. त्यामध्ये अंडी, अळ्या तयार होतील. हे पाणी निरोगी लोकांना पिण्यास द्यावे त्यांना त्यामुळे नक्कीच ताप येईल.
या सूचनेप्रमाणे रॉसने अब्दुल कादिर या मलेरियाग्रस्त रुग्णाला ते डास चावविले, नंतर पुन्हा डासांना पकडून पाण्याच्या बाटलीत बंदिस्त केले. यथावकाश ते मेल्यावर सर्व पाणी आपला विश्वासू नोकर लछमन व त्याच्या दोन भावांना पिण्यास दिले.
लछमनला अंग कणकणणारा ताप आला पण तो दोन दिवसात औषधाशिवाय बरा झाला. बाकीच्या दोघांची प्रकृती ठणठणीत होती. त्या तिघांच्या रक्ततपासणीत परोपजीवी दिसले नाहीत.
आता मात्र रॉस बुचकळ्यात पडला. मॅन्सनचा सिद्धांत मानावा का दुसरा मार्ग शोधावा अशा संभ्रमावस्थेत रॉसने पत्राद्वारे मॅन्सनला कळविले की यापुढे मी वैद्यकीय शास्त्राकडे पाठ फिरवत आहे. मला या संशोधनात जराही रस राहिलेला नसून मी साहित्य व कला शास्त्राकडे वळत आहे. या निराशावस्थेत रॉसने एक कविताही लिहिली. हे पत्र वाचल्यावर मॅन्सनचे माथेच भडकले. त्याने रॉसची कडक शब्दात चांगलीच हजेरी घेतली व तो खुळचट निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. या मॅन्सनच्या बहुमोल सल्ल्याचे वैद्यकीय शाखेवर महान उपकार आहेत.
Leave a Reply