नवीन लेखन...

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ५

१८९५ ते १८९९ यादरम्यान रॉस व मॅन्सन यांच्यामधील १७३ पत्रांच्या माध्यमातून झालेला संवाद मलेरियावरील संशोधनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. हजारो मैल एकमेकांपासून दूर असलेल्या या दोन संशोधकात पत्रांमधून संशोधनासंबंधीची अनुमाने, त्यावरील टिपणे, डासांची हाताने काढलेली चित्रे व रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या काचपट्ट्या या सर्वांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात हे सर्व बाड पोहोचण्यास कमीत कमी चार आठवडे लागत, यावरून दोघांच्या चिकाटीची व जिद्दीची कल्पना येते. रॉस व मॅन्सन यांच्यामधील हा सर्व पत्रव्यवहार लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (London School of Hygine and Tropical Medicine) येथे व्यवस्थित जतन केलेला आहे. इकडे भारतात रॉसच्या मागील सरकारी शुक्लकाष्ट संपत नव्हते. हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये तो संशोधनात बुडून गेलेला असताना उच्च अधिकाऱ्याने त्याची बदली बंगलोर येथे कॉलऱ्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी केली. कामाचा बोजा इतका होऊ लागला की रॉसला मलेरियावरील संशोधनास वेळ मिळेनासा झाला. रात्री कामावरून आल्यावर त्याच्या डोक्यात डासांबद्दलचे विचार थैमान घालीत. मात्र आता त्याच्या विचारांची दिशा मॅन्सनवर अवलंबून नव्हती. तोपर्यंत रॉसची अशी ठाम खात्री झाली होती की माणसाला चावताना डास त्याच्या शरीरातून काहीतरी द्रवपदार्थ त्या माणसाच्या शरीरात सोडतो ज्या द्रवामधून मलेरियाचे परोपजीवी माणसाच्या रक्तात पसरतात.

१८९७ मध्ये उटकमंडलम् जवळील सिंगून गावातील तापाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी रॉस त्या रोजच्या कामगिरीवर रुजू झाला. परंतु त्यालाच मलेरियाने बेजार केले. खिडक्या बंद करून व मच्छरदाणीत झोपूनही डासांनी त्याला गाठल्याने तो अशा उद्विग्न मनस्थितीत पलंगावर पहुडला असताना, भिंतीवर ऐेटबाज पद्धतीने बसलेल्या एका गडद पिंगट रंगाच्या डासाने रॉसचे लक्ष वेधून घेतले. डासांच्या वेगवेगळ्या गटांचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे रॉसच्या मनाने उचलून धरले.

सिकंदराबाद येथे जून १८९७ मध्ये त्याची बदली झाली. अजूनही रॉसपुढील अडचणी संपता संपत नव्हत्या. कामावर हजर होताच रॉसला स्वतःलाच कॉलर्‍याने गाठले. प्रचंड शक्तिपात झाल्याने कामात लक्ष लागेना. शेवटी एकेका उकळत्या चहाच्या कपाने का होईना, परंतु त्याची तब्येत सुधारू लागली. खंबीर मनाने रॉसने विविध जातीच्या डासांचा शास्त्रोक्त अभ्यास सुरू केला. आता आपल्या प्रयोगात वेगवेगळ्या गटांचे डास वापरताना असे लक्षात आले कि फक्त एकाच गटाच्या डासांमध्ये मलेरियाचे परोपजीवी दिसतात, तेव्हा आत्तापर्यंत आपण कोणत्याही गटाचे डास प्रयोगात वापरीत होतो, ती आपली फार मोठी चूक होती. त्या कारणामुळे रॉसच्या पदरी अपयश येत होते. मादी ऍनॉफेलीस हिच मलेरिया पसरविण्यात जबाबदार आहे या निरीक्षणाचा हळूहळू उलगडा होऊ लागला.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..