नवीन लेखन...

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ६

आता यापुढे रॉसने फक्त अनोफेलेस डासाच्या मादीच वरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. डासांचे विच्छेदन करीत असताना मायक्रोस्कोप खाली डासांच्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास करण्यात तो तासनतास मग्न असे. सिकंदराबाद मधील प्रचंड उन्हाळ्यात 45 डिग्री 47 डिग्री तापमान असताना विच्छेदन केलेले डास जराशा वाऱ्याने सुद्धा उडून जाऊ नयेत म्हणून खोलीतील एकमेव झुलता पंख आई हलवता येत नसे. विच्छेदन केलेल्या डासांवर जमा झालेले असंख्य किडे रॉसच्या व सहाय्यकांच्या डोळ्यात स्वल्पविराम कानात शिरण्याचा प्रयत्न करीत. काही गुणगुणगुणारे डास आपल्या मेलेल्या जातभाईंना पाहून जणू रागाने त्यांच्यावर हल्ला करीत.

मायक्रोस्कोप लेन्स हलविण्याचे स्क्रू रॉसच्या शरीरावरील टप टप पडणाऱ्या घामाच्या धारांनी गंजून गेले होते. त्यातच त्याच्या जवळील मायक्रोस्कोप ची एकमेव लेन्स निकामी झाल्याने रॉस हतबल झाला होता. त्याच्या मनावर इतके दडपण होते की दुपारच्या वेळी सुद्धा त्याला स्वतःचे घर सापडणे कठीण होत असे. सतत त्याला डोळ्यासमोर काळोखातील हॉस्पिटलचा व्हरांडाच दिसत असे.

१५ ऑगस्ट १८९७ रोजी रॉसच्या मदतनीसानेत्याला अभिप्रेत असलेल्या जिवंत पिंगट डासांची फौज पकडून आणून दिली. रॉसने हुसेन खान नावाच्या एका मलेरिया ग्रस्त रुग्णास मच्छरदाणीत झोपून त्याच्या अंगावर हे नवीन डास सोडले. रुग्णाचे रक्त शोषून डास टरटरुन फुगले. हुसेन खानचा रक्तातील क्रिसेंट स्थितीतील परोपजीवी डासांचा शरीरात पसरले. हुसेन खान ला प्रत्येक डासामागे एक आणा याप्रमाणे दहा आणे बक्षिसी मिळाली. १७ तारखेला यातील दोन डासांच्या विच्छेदनात कोणताही बदल दिसला नाही. १९ तारखेला केलेल्या दुसर्‍या दोन डासांच्या विच्छेदनात डासांच्या जठर आवरणाच्या पृष्ठभागावर पारदर्शक बुडबुड्यासारख्या पांढऱ्या पेशी अंदाजे ( 10 Micron size )दिसत होत्या. साधारणतः एखाद्या बारीक टिंबा एवढ्या आकाराच्या !

२० ऑगस्ट हा अतिशय उकाड्याचा दिवस होता. रॉसने वॉर्ड मध्ये जाऊन हुसेनला तपासले. तो आजारातून पूर्णपणे बरा झाला होता. नाश्ता करून रॉस थेट उरलेल्या काही डासांच्या विच्छेदनाकडे वळला. या डासांच्या विच्छेदनात जठर आवरणावरील नवीन तयार झालेल्या पेशी या डासाच्या जठर पेशींपेक्षा ठळकपणे वेगळ्या आहेत असे लक्षात आले. तास तास निरीक्षण करताना त्याला या प्रकारच्या अनेक पेशी दिसू लागल्या व या पेशींमध्ये काळ्या रंगाचे कणांचे पुंजके दिसत होते. या सर्व पेशींची चित्रे आपल्या वहीत नोंदवून थकलेला रॉस रात्री घरी गेला.

या काळ्या रंगाच्या पुंजक्याने तो चक्रावून गेला. हेच ते वाढलेले मलेरियाचे परोपजीवी आहेत की काय आणि जर तसे असेल तर पुढील २४ तासात त्यांचा आकार उरलेल्या व पकडून जिवंत ठेवलेल्या डासांमध्ये नक्कीच वाढेल. या विचारांच्या कल्लोळात रॉस रात्रभर तळमळत होता. त्यातूनही उरलेले डास जर मरून गेले तर त्यांची शरीरे कुजतील आणि आणि नंतर विच्छेदनातून काहीही शोधणे अशक्य होईल अशीही एक जर आणि तरची भीती मनात डोकावत होती.

२१ ऑगस्ट चा दिवस उजाडला. रॉस घाईघाईने प्रयोगशाळेत गेला आणि त्याने शेवटच्या काही डासांचे विच्छेदन सुरू केले. या डासांच्या जठरपेशीत नवीन तऱ्हेच्या २१ पेशी तयार झाल्या होत्या व प्रत्येक पेशीत काळ्या कणांचा पुंजका दिसत होता. ही प्रत्येक पेशी म्हणजे मलेरियाच्या परोपजीवाची डासाच्या शरीरातील महत्त्वाची अवस्था होती.

रॉस आनंदाने नाचू लागला. अखेर त्याच्या जीवनातील सोनेरी पहाट उजाडली होती. ती रोमहर्षक बातमी रॉसने ताबडतोब मॅन्सनला कळविली व सोबत या आनंदी क्षणाच्या अनुभूतीची कविताही पाठवली. तेव्हापासून २० ऑगस्ट हा डास दिवस (mosquito day) म्हणून साजरा केला जातो.

चार सप्टेंबरला सिकंदराबाद मून थेट आपल्या बंगलोरच्या घरी आला. शांत चित्ताने या संशोधनातील आपली निरीक्षणे व चित्रे व्यवस्थित उतरवुन त्याने तो उल्लेख इंग्लंडला पाठवून दिला. लेखाचे शीर्षक होते डासाच्या जठार पेशीत आढळलेले मलेरिया परोपजीवी या स्थितीचे काळे पुस्तके(black Pigments) हा लेख British Medical Journal december 18, 1897 च्या अंकात प्रसिद्ध झाला.

डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..