डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या कवी संमेलनातच मी पहिल्यांदा त्यांच्या चारोळ्या वाचल्या होत्या आणि त्यांना बोलताना ही ऐकल होतं. त्यांच्या चारोळ्या मला प्रचंड आवडल्या होत्या. ते एक उत्तम कवी आहेत याबद्दल वादच नाही. पण कवी म्हटला की तो स्वप्नात अथवा कल्पनेत गुंतलेला असतो असा सर्वसाधारण लोकांचा समज असतो त्यांचा हा समज मला नाही पण कारंडे साहेबांना पाहिल्यावर नक्कीच दूर होतो.
त्यांची आणि माझी पुर्वीची कोणतीही ओळ्ख नसतानाती ती व्यक्ती मला पहिल्याच भेटीत आवडली त्याला आणखी एक कारण असावं ते म्ह्णजे मला राजकारणातील दोनच व्यक्ती आवडतात एक आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राजसाहेब ठाकरे का ते मला स्पष्टपणे नाही सांगता येणार पण मला माझे आवडते चित्रपटातील हिरो कोण ते लगेच सांगता येत नाही पण राजकारणातील या दोन व्यक्ती माझ्यासाठी कधीच बदलत नाहीत माझा राजकारणाशी फारसा संबंध नसतानाही. त्यावेळी डॉ. शांताराम कारंडे यांनी नुकताकच मनसेत प्रवेश केला होता आणि याची मला कल्पना होती. त्यामुळे कदाचित एका वेगळ्या चष्म्यातून मी त्यांच्याकडे पाहिले ही असेल. त्यापुर्वी त्यांची मला आर्कीटेक आणि कवी इतकी ओळख असली तरी ते भविष्यातील ते एक चांगला राजकारणी म्ह्णून आपली ओळख निर्माण करतील याची मला तेंव्हा ही खात्री वाटत होती. आता ते साहित्य आणि कलेच्या क्षेत्रासोबत आपले अनेक उदयोगधंदे सांभाळत राजकारणातही यशस्वी घोडदौड करीत आहेत.
डॉ. शांताराम कांरंडे आणि माझी जवळीक जरी साहित्यामुळे असली तरी त्यांच्यातील राजकारणीही मला प्रचंड भावतो. एक साहित्यिक म्ह्णून मला त्यांच्याबद्दल आदर आहेच पण एक राजकारणी म्ह्णूनही ते मला तितकेच आदरणीय आहेत हे महत्वाचे आहे. एखादया र्तमानपत्रात, साप्ताहिकात अथवा मासिकात त्यांचा लेख दिसला की मी तो पुर्वी ही आवर्जून वाचायचो आणि आजही वाचतो आणि तो वाचल्यावर ही व्यक्ती समाजकारण आणि राजकारण यात प्रचंड व्यस्थ असतानाही साहित्य निर्मितीसाठी वेळ काढते याचे मला विशेष कौतूक वाटते. त्यांचे लिखाणातील सातत्य खरोखरच स्तुती करण्यासारखेच आहे. नाहीतर मी शेकडो कवीता लिहल्या पण एखादया महिन्यात एक ही कविता लिहली नाही की स्वतःशीच म्ह्णतो हया महिन्यात मला कविता लिहायला वेळ्च मिळाला नाही. डॉ.शांताराम कारंडे यांना मधल्या काळात मी कधीही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. आमच्या भेटीच माध्यम बर्याीचदा साहित्य हेच होत. राजकारणी म्ह्णून समाजकारणात त्यांचा सक्रीय सहभाग जेंव्हा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने वाचनात येतो तेंव्हा त्यांच्या बद्दलचा माझ्या मनातील आदर आणखी वाढतो. मी राजकारणापासून शकयतो दूरच राहतो. पण तरी ही माझा आणि राजकारणाचा संबंध हया ना त्या कारणाने येतच असतो. पण डॉ. शांताराम कारंडे आणि माझी भेट पुन्हा राजकारणामुळे नाही तर बर्यााचदा साहित्यामुळेच झाली. डॉ.शांताराम कारंडे यांना त्यांना भेटलेल्या लोकांना त्यांच्या नावासह लक्षात ठेवण्याची सवय आहे नव्हे हा त्यांच गुणच म्ह्णावा लागेल. डॉ.शांताराम कारंडे एक राजकारणी, उदयोजक, कलाकार आणि साहित्यिक म्ह्णून किती मोठे आहेत हे जाणून घेण्याची मला कधी गरजच भासली नाही कारण एक माणुस म्ह्णून ते फारच छान आहेत. समाजातील सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर साहित्याकांनाही मदत करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलेला असावा.
मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बरेचसे साहित्यिक त्यांना राजकारणी म्ह्णून कमी तर साहित्यिक म्ह्णून अधिक ओळखतात आणि त्यांची ही ओळख त्यांना मिळालेले असंख्य साहित्यिक पुरस्कार अधोरेखीत करतात. हा लेख वाचताना कदाचित वाचकांना प्रश्न पडला असेल की मी अचानक डॉ.शांताराम कारंडे यांच्यावर लेख का बरं लिहला असेल. त्याला एक खास कारण आहे मला गुरूतुल्य असणार्यां माझ्या या मित्राचा नव्हे तर वडिल बंधूचा 28 मार्च रोजी वाढदिवस होता. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट काय दयावी हा माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न होता. त्यांना मी लवकरच माझा पुढचा कविता संग्रह सस्नेह अर्पण करणार आहेच पण तत्पुर्वी काय करावे म्ह्णून मी हा लेख लिहण्याचा प्रपंज केला. आमच्या माझे व्यासपीठ या मासिकाचे आज जरी ते सहसंपादक असले तरी आमची भेट धावपळीतच होते निवांत म्ह्णता येईल अशी चर्चा आमच्यात कधीच होत नाही आणि माझी तशी इच्छा ही नसते कारण त्यांच्या वेळेची किंमत ठरलेय आणि ती किंमत मी जाणलेय त्यामुळे त्यांच्या वेळेची किंमत माझ्याठायी ही जास्तच आहे. राजकारणात असतानाही शत्रू नव्हे तर मित्र गोळा करणारा म्हणून त्यांची ओळ्ख निर्माण होत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. भविष्यात एक लोकप्रिय राजकारणी म्हणून ते आपली ओळख निर्माण करतील याची मला खात्री वाटते. लोकांच्या सेवेत अहोरात्र उपलब्ध असणारे डॉ.शांताराम कारंडे हे आपले समाज सेवेचे व्रत यापुढे ही तसेच सुरू ठेवतील याची मला खात्री वाटते. मी व्यक्तीशः एक राजकारणी म्ह्णून नाही पण समाजाचा एक घटक, त्यांचा एक हितचिंतक अथवा समर्थक म्ह्णून कधीतरी त्यांच्या मागे उभा दिसेनही. डॉ. शांताराम कारंडे हे नवोदित साहित्यिकांसाठी अंधारात कोठेतरी दुरवर जळणार्याउ दिव्यासारखे असले तरी तरी ते साहित्यिकांना फक्त आशेचा किरण दाखवित नाहीत तर प्रत्यक्षात मदतही करतात हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगू शकतो. आज डॉ.शांताराम कारंडे ज्या – ज्या क्षेत्रात आहेत त्या – त्या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे याबद्दल कोणाचे ही दुमत नाही. प्रचंड धावपळ कामचा व्याप असतानाही कविता वाचताना त्यांच्या चेहर्याहवरून ओसंडणारा आनंद जेंव्हा मी प्रत्यक्ष पाहिला तेंव्हा एक कवी म्ह्णून मी खर्याय अर्थाने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि मी स्वतःशी पुटपुटलो…
कारंडे साहेब…
तुंम्हाला म्ह्णू मी राजकारणी की कवी
साहित्यिक, कलाकार की बुध्दीजीवी…
तुंम्हाला म्ह्णू मी रसिक की उत्साही
मित्र, बंधू की माझा सोबती…
एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे
चालणारे आपण आहोत सहप्रवासी…
आपले ध्येय आपल्या आवडीनिवडी
आपले आचार-विचार आणि स्वप्ने आहेत निराळी…
विचारमंथन करून आपण दोघेही नकळ्त
बाहेर काढतोच सुविचार जगासाठी…
त्या सुविचारांनीच जोडली गेली आहेत
आपली आपल्या सभोवतालची सारी नाती…
तुमच्या वाढदिवसा निमित्त मी ही
भेट दिली तुंम्हाला फक्त शब्दांची…
त्या शब्दातून तुमच्याप्रती अगदी सह्ज
व्यक्त होणार्याम माझ्या प्रेमाची….
लेखक – निलेश बामणे.
Leave a Reply