नवीन लेखन...

डॉ. वसंत गोवारीकर

डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला ते एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले.

या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांन त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासार्ट भारतात बोलावून घेतले १९६७ साली ते थुम्ब येथे झाले अग्निबाणांसाठी लागण घन इंधन बनवण्याच जबाबदारी त्यांच्या व सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वर्षे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे.

१९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. त्यांच्या संचालकपदाच्या काळात एसएलव्ही -३ प्रकल्पात अग्निबाणाच्या साहाय्याने भारताच्या पहिल्या उपग्रहाचे उड्डाण होऊन तो पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. विज्ञान सर्वसामान्यांच्या मनात रुजावे म्हणून त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. गेली २७ वर्षे व सुरू असलेला राष्ट्रीय विज्ञान दिन १९८७ पासून त्यांनी सुरू केला. देशातील विज्ञान प्रसारकांना पुरस्कार देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली.

देशभर विज्ञान प्रसाराचे अनेक कार्यक्रम या खात्यामार्फत त्यांनी सुरू केले. याच काळात त्यांच्या अखत्यारीत खात्याच्या येणाऱ्या हवामान खात्यातर्फे १६ परिमाणांच्या आधारे त्यांच्या प्रेरणेने मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त व्हायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. १९९७ पासून त्यांनी शेतीच्या खतांचा विश्वकोश तयार करून जगभरच्या शेतकऱ्यांसाठी जगातला पहिला कोश २००५ मध्ये उपलब्ध करून दिला. आज या कोशाला जगभर प्रचंड मागणी आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..