नवीन लेखन...

डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे ऊर्फ अप्पा पेंडसे

शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, व पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला.

अप्पा पेंडसे हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते. स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.

ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.

अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बॅँड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्याठ भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते. भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची १९६२ मध्ये स्थापना केली. अप्पा पेंडसे यांचे चरित्र डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी लिहिले आहे.

अप्पा पेंडसे यांचे १९ ऑगस्ट १९८३ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..