नवीन लेखन...

नाटककार के. नारायण काळे

केशव नारायण काळे यांचा जन्म २४ एप्रिल १९०४ रोजी झाला. ते के. नारायण काळे या नावाने साहित्य, नाट्य, चित्र जगतात ओळखले जात. काळे हे त्या काळातले बी. ए. एल.एल. बी. होते. ते इतके शिकले असले तरी त्यांना रस होता तो साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात. त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. नाटकाच्या आवडीमुळेच के. नारायण काळे हे नाटककार झाले.

सुरुवातीच्या काळात के.नारायण काळे यांनी ’ भावशर्मा ’ या नावाने कविता आणि कथा लिहिल्या. इ.स.१९३२साली त्यांचा ’ सहकारमंजिरी ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळी इम्पिरिअल कंपनीने १९२८ साली जगद्गुरू शंकराचार्य यांचावर मूकपट काढण्याचे ठरले आणि पार्श्वनाथ आळतेकर यांनी त्याचे दिग्दर्शन करणार होते. पार्श्वनाथ आळतेकर यांनी मामा वरेरकर यांच्याकडून त्याची पटकथा लिहून घेतली. तर शंकराचार्य यांच्या कामासाठी के. नारायण काळे यांची निवड केली. काळे यांनी अभिनय केलेला हा पहिलाच चित्रपट होता.

१९३० साली काळे यांनी ‘ हूज फॉल्ट ‘ या आणि अशाच एक-दोन मूकपटातून त्यांनी कामे केली होती. त्यानंतर ‘ रत्नाकर ‘ या मासिकाचे संपादकपद स्वीकारले.

काळे ‘ नाट्यमन्वंतर ‘ या नाट्यसंस्थेच्या चळवळीत भाग घेत असत. के. नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव भोळे, केशवराव दाते आणि वर्तक यांच्यासारखी मंडळी यामध्ये होती. नाट्यमन्वंतर या संस्थेने ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक रंगमंचावर सादर केले. परंपरेने आलेलेल संगीत पौराणिक-ऐतिहासिक नाटक नाकारून के. नारायण काळे, अनंत काणेकर, पार्श्वनाथ आळतेकर, ग. य. चिटणीस आदी नाट्यविचारवंतांनी एकत्र येऊन ‘ आंधळ्यांची शाळा ‘ ची निर्मिती केली. यासाठी के. नारायण काळे यांना त्यांचा परदेशी रंगभूमीचा व्यासंग कामी आला.

१ जुलै १९३३ रोजी झालेल्या या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात केशवराव दाते, नाटककार वर्तकांच्या पत्नी सौ. पद्मावती वर्तक, म. रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, पितळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर आणि के. नारायण काळे यांच्या भूमिका होत्या. नाटकाच्या नायिका अठरा वर्षे वयाच्या ज्योत्स्ना भोळे होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्या आसपास प्रयोग झाले होते. तेव्हा त्यांना व्ही. शांताराम यांनी प्रभातमध्ये बोलवले. त्यावेळी ‘ प्रभात ‘ मध्ये ‘ अमृतमंथन ‘ या चित्रपटाची निर्मिती चालली होती. त्या चित्रपटाचे गीत-संवादलेखन काळे यांनी केले. काळे हे तसे पुरोगामी विचारणाचे होते त्यांनी व्ही. शांताराम यांना ‘ संत एकनाथ ‘ यांच्या जीवनावर चित्रपट करण्याचे सुचवले. कारण संत एकनाथ यांनी त्याकाळी हरिजनांच्या उद्धाराची क्रांतिकारी सुधारणा प्रत्यक्ष कृती करून अमलात आणली होती. काळे यांनी ‘धर्मात्मा’ या चित्रपटाचे संवादलेखन, पटकथा लेखन केल आणि त्या चित्रटपटातून एकनाथांच्या मुलाचे कामही केले. त्याचप्रमाणे के. नारायण काळे यांनी प्रभातला ‘अमरज्योती’ नावाची एक कथा लिहिली, हा चित्रपट हिंदी भाषेत होता त्यात दुर्गा खोपटे, शांता आपटे, वासंती आणि चंद्रमोहन यांच्या भूमिका होत्या. त्या चित्रपटात काळे यांनीही भूमिका केली होती.

व्ही. शांताराम यांनी काळे याना ‘ वहॉ ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्यामध्ये आर्य आणि अनार्य यांच्यामधील संघर्ष दाखवला होता. त्याचप्रमाणे काळे यांनी प्रभातच्या दुसरा चित्रपटही दिग्दर्शित केला होता त्याचे नाव होते ‘ माझा मुलगा ‘. पुढे प्रभात मधून बाहेर पडल्यावर त्यांनी नवयुग पिक्चर्स चा ‘ लपंडाव ‘ हा चित्रपट केला त्यात मा. विनायक, मीनाक्षी, वनमाला आणि बाबुराव पेंढारकर हे कलाकार होते.

के. नारायण काळे यांनी आठ चित्रपटांत कामे केली होती. नाट्यकलेच्या आकर्षणातून त्यांनी इ.स.१९३३मध्ये ’नाट्यमन्वंतर’ ही नाट्यसंस्था काढली. त्यांनी ‘ मुद्रा राक्षसम्‌ ‘ या संस्कृत नाटकाचे ‘ कौटिल्य ‘ या नावाचे भाषांतर करून ते त्या संस्थेतर्फे रंगमंचावर आणले. त्यागराज कैलासम्‌ यांचे ‘ दि पर्पज ‘ हे नाटक त्यांनी प्रयोजन ’ या नावाने रंगभूमीवर आणले. त्याचप्रमाणे त्यांनी ’अभिजात’ ही चित्रपट कंपनी स्थापन केली आणि ’ म्युनिसिपालिटी ’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात चित्रसंस्थेवर के. नारायण काळे यांनी एक लघुपट काढला होता.

के. नारायण काळे यांनी अभिनयसाधना म्हणजे ’ॲन ॲक्टर प्रिपेअर्स’ या स्टॅनिस्लेवास्कीच्या नाट्यशास्त्रावरील ग्रंथाचे भाषांतर, कौटिल्य, प्रतिमा, रूप आणि रंग, मराठी नाटक व मराठी रंगभूमी यासंबंधी समीक्षा, सहकारमंजिरी (कवितासंग्रह ) ही पुस्तके लिहीली त्याचप्रमाणे त्यांनी रत्नाकर, प्रतिभा आणि मराठी साहित्य पत्रिका या नियतकालिकाचे संपादकपद भूषवले. के. नारयण काळे हे कलातत्त्वचिंतक, साहित्यसमीक्षक आणि पुरोगामी विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते.

के. नारायण काळे यांचे २० फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..