डिसेंबर महिना उजाताच शाळेत लगबग असे ती वार्षिक स्नेह संमेलनाची .जणू वेधच लागत . एके वर्षी आम्ही स्नेहसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीनंतर हॉलमध्ये जमावयास सांगितले होते . सुट्टी संपताच विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकच गलका केला आम्ही दोन-तीन शिक्षक कार्यक्रमाच्या आवश्यकते प्रमाणे विद्यार्थ्यांची निवड करणार होतो
मुख्याध्यापिका म्हणून मी प्रथम पोचले व शिक्षक दहा मिनिटांनी येणार होते. मी कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी तयार केलेल्या नोट्स चाळत होते पण सर्व लक्ष मुलं काय बोलतात तिकडे होते .
तेवढ्यात सतीश म्हणाला चल आपण जाऊ. या मुलांमध्ये आपल्याला कशासाठी निवडतील ? गायत्री हर्षदाला सांगत होती. मुख्य भूमिका, तसेच सरस्वती व्हायलाआसावरीला मिळणार . आपण कुठे आहोत उंच, सुंदर, गोऱ्यापान आणि लांब केस वाल्या .मनातल्या मनात मला हसू येऊ लागले .
तर मनोज म्हणत होता” ब्युटी अँड द बीस्ट” मधल्या तरुण राजपुत्राची भूमिका मला करायची आहे. मी ती कसंही करून मिळवणारचआहे . मी दिसायला अगदी राजबिंडा आहेच आणि त्यात इंग्लिशही चांगलं बोलू शकतो.
आपण तर बुवा कोळी नृत्य किंवा भांगडा नृत्य यातच भाग घेणार .कसं नटायला थटायला मिळत. -असा अनघाचा दृष्टिकोन.
राजन तर म्हणाला मी एवढा इटुकला पिटुकला. मला मानवी मनोरे मध्ये सगळ्यात वरती चढायच आहे. पण टीचरनी निवडले पाहिजे ना ?
मुलांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन मला उलगडत जात होता
आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.
— वासंती गोखले
Leave a Reply