दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे ।।१।।
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो ।।२।।
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना ।।३।।
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी ।।४।।
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply