कसे मानू उपकार, देवा तुझे
देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे
खेळ आहे जेथें, हार जीत आहे
घर बांधणीते, पड झड पाहे
असे जन्ममरण, ह्याच देहीं
हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही
एक दुःख येतां, मन होई निराश
काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश
एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां
जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां
निसर्गाची रीत, दुःख तोची काढी
करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी
दुःख होते दुर, हेच आणिल समाधान
दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply