दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,
या परि अनुभव दुजा कोणता ।
सत्य समजण्या कामी न येई,
तेथ कुणाची कल्पकता ।।१।।
धगधगणारे अंगारे हे,
जाळती काळीज ।
शब्दांचे फुंकार घालूनी,
येईल कधी का समज ।।२।।
मर्मा वरती घाव बसता,
सत्य येते उफाळूनी ।
चेहऱ्यावरले रंग निराळे,
हलके हलके जाती मिटूनी ।।३।।
त्या दुःखीताला जाणीव असते,
जीवनामधली निराशा कशी ।
झेप घेवूनी समरस होतो,
इतर जणांच्या काळजाशी ।।४।।
सुख दु:खातील दु:ख अधिक ते,
पदोपदी जे दिसून येई ।
दु:खीतांचे अश्रू पुसण्या,
दु:खी अनुभवी धाव घेई ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply