रस्त्यावरुन चालताना रुतले
पायात माझ्या काटे कितीक
चालत होतो अनवाणी मी
त्यात काट्यांचा काय दोष ।
दोष होता माझा खरा
अनवाणी मीच चाललो
दोष काट्याच्या मारुन माथी
चूक माझीच मी लपवितो ।
येथे दुबळ्यांचे जगणे असेच
नियम आहे या जगाचा
तुडऊन जातील ते तुम्हास
बघतील फक्त स्वार्थ स्वताचा ।
होऊ नका दुबळे तुम्ही कधी
झुकू नका कधी जीवनात
द्या टक्कर या बलवानांना
पदोपदी द्या काट्यासम ऊत्तर ।
— सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
३ नोव्हेंबर २०१८