पक्ष्याचे एक लहानसे पिल्लू आपल्या आईशी बोलत आहे अशी कल्पना करून,—-!!!!
दूरवर गगनी उडत निघाली,
सगळ्या पक्षांची माला,
आई, झुंजूमुंजू झाल्यावरती,
उडू दे ग लांब मला,—!!!
त्यांच्यासवे फिरेन आकाशी,
पाहेन रंगीबेरंगी दुनिया,
होईन मग मी खूप आनंदी,
विशाल उंच आभाळात या,–!!!
निळ्या काळ्या ढगांवरती,
कसे स्वार होऊनिया,
पक्षी सारे माग काढती,
उंच गगनात जाऊन या,–!!!
आपले मोठे पंख पसरुनी,
जवळ घेऊन आपुल्या पाया, अमर्याद नभा तोंड देती,
तयार मीही धाडस करण्यां,–!!
तीक्ष्ण नजरा, ताकद पंखी,
सावध राहून हालचाल करता,
जेथे कुठे माळ रानां उतरती, चाणाक्ष ते शत्रूस जोखता,–!!!
नागसापांची आपल्याला भीती, पाण्याजवळ दक्ष राहता,–!!!
माणूस निष्ठुर जाळे टाकी,
करत कैद बघ भाईबंदा,–!!!
जाण मला या सगळ्याची,
दक्ष अन् सतर्क राहता,
मी तर तुमच्या पुढील पिढी, चिमुकला तरी हुशार असतां,–!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply