दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२,
निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३,
स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य ते सहज होत…४
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply